लायकी ओळखून टीका करा; काळे नगरसेवकांचे प्रत्युत्तर

लायकी ओळखून टीका करा; काळे नगरसेवकांचे प्रत्युत्तर

वृत्तवेध ऑनलाईन। 11 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 19:15

कोपरगाव : विधानसभेच्या निवडणुकीत लक्ष्मी नगरच्या जनतेला सातबारा देण्याचे वचन तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे देत होत्या तेंव्हा टीका करताना गाजर असल्याचे म्हणणारे विद्यमान आमदार निवेदनाचा फार्स करून लक्ष्मी नगरच्या नागरिकांना ७/१२ चे गाजर दाखवत असल्याची जोरदार टीका कोल्हे गटाच्या सौ. हर्षा कांबळे व स्वप्निल निखाडे या नगरसेवकांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर केली होती.
यालाच आता काळे गटाचे नगरसेवक किरण बोरावके व माधवी वाकचौरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ज्यांना आपल्या प्रभागातील गटारी करता आल्या नाही, त्यांनी स्वत:ची लायकी ओळखून टीका करावी,’ असं म्हणत विरेन बोरावके यांनी कोल्हे गटाच्या नगरसेवकावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

कोपरगाव शहरातील कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. ११३ (भाग) व ११४ (भाग) मधील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील नागरिकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचा मुद्दा कळीचा ठरला आहे. काळे कोल्हे नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाॅर सुरू आहे .

विकास कामांच्या बाबतीत आमदार आशुतोष काळे काय चीज आहे पाच नंबर साठवण तलावाचे खोदाई काम पूर्ण करून हे त्यांनी निवडणुकीनंतर तीनच महिन्यात दाखवून दिले आहे ते तुमच्या नेतृत्वाला स्वत:च्या पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात असतांना करता आले नाही. माजी आमदारांना या नागरिकांची आता आठवण झाली का? मग पाच वर्ष काय केलं?असा घणाघात विरेन बोरावके यांनी केला आहे.

कोरोनाच्या संकटात देखील कोपरगाव मतदार संघात विकास कामे सुरु आहेत यासाठी डोळ्यावरची झापड दूर करा. आमदार आशुतोष काळे विकास सूर्य आहेत या सूर्यावर थुकण्याचा प्रयत्न करू नका वक्तव्य करतांना काळजी घ्या, अन्यथा येत्या काळात वेगळ्या पद्धतीने जशास तसे उत्तर दिले जाईल असा ईशारा वीरेन बोरावके यांनी दिला आहे.
विकास कामाच्या श्रेयावरून काळे कोल्हे यांच्या नगरसेवकामधील संघर्ष अधिकच तीव्र होण्याचे चिन्ह आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page