निवेदनाचा फार्स हे तर लक्ष्मीनगरच्या नागरिकांना ७/१२ चे गाजर – कोल्हे नगरसेवकांचा आरोप
मा. आ. स्नेहलता कोल्हे यांच्यामुळेच लक्ष्मी नगर चा ७/१२ ला चालना
वृत्तवेध ऑनलाईन। 11 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 19:15
कोपरगाव : विधानसभेच्या निवडणुकीत लक्ष्मी नगरच्या जनतेला सातबारा देण्याचे वचन तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे देत होत्या तेंव्हा टीका करताना गाजर असल्याचे म्हणणारे विद्यमान आमदार आज निवेदनाचा फार्स करून लक्ष्मी नगरच्या नागरिकांना ७/१२ चे गाजर दाखवत असल्याची जोरदार टीका कोल्हे गटाच्या सौ. हर्षा कांबळे व स्वप्निल निखाडे यां नगरसेवकांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
लक्ष्मीनगर च्या नागरिकांच्या नावावर घरे व्हावी स्वतःचे घर मिळावे यासाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नागरिकांच्या मीटिंगा घेतल्या प्रस्ताव तयार केला मंत्रालयात पाठपुरावा केला आज मितीला सदर प्रस्ताव नगर येथे नगररचना, मूल्यनिर्धारण विभागात पडून आहेत. ही वस्तुस्थिती आहे. केवळ निवेदनाने कोणतेही काम पूर्ण होत नाही तसा प्रस्तावही पाठविलेला नाही. तरीही ते आज निवेदन देतानांचे फोटो सोशलवर टाकत आहेत.म्हणजेच त्यांनी लक्ष्मी नगरच्या नागरिकांना‘गाजर’ दाखविले आहे. किंवा एक तर त्यांना लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याची कुणकुण लागल्याने याचे श्रेय मिळावे याच साठी विद्यमान आमदारांचा अट्टाहास तर नाही ना ? असा सवालही कांबळे – निखाडे यांनी पत्रकातून उपस्थित केला आहे.
पत्रकात पुढे म्हटले की तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामे केली. काही कामे प्रगती पथावर तर काही अंतिम टप्यात आहे.मात्र, एक रुपयाचा विकास निधी न देता राजकीय श्रेयासाठी विद्यमान आमदार कामाच्या पहाणीच्या नावाखाली फिरत आहे शहराच्या विकासासाठी विद्यमान आमदारांचे योगदान शुन्य आहे, त्यांनी फक्त मिटींगा, आश्वासने दिली. गाजाबाजा करुन विकास होत नसतो त्यासाठी पाठपुरावाच करावा लागतो.
माजी आमदारांमुळेच लक्ष्मीनगर भागातील सातबारा प्रश्नाला चालना मिळाली आहे हे विद्यमान आमदारांना विसरुन चालणार नाही. असा टोला नगरसेवक सौ वर्षा कांबळे व स्वप्निल निखाडे यांनी पत्रकातून लगावला आहे.