पोहेगांव लॉकडाऊन रविवार पर्यंत – अमोल औताडे
वृत्तवेध ऑनलाईन। 13 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 16:05
कोपरगाव : तालुक्यात सध्या कोरोनाचा वाढता फैलाव आहे. पोहेगावांतही जवळपास २७ रुग्ण आढळून आले होते. पैकी १० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. उर्वरित १७ रुग्णावर उपचार चालू आहे. मात्र परिसरात अजूनही पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने खबरदारी म्हणून पोहेगाव बंद रविवार (१६ ऑगस्ट) पर्यंत वाढवला आहे.अशी माहिती पोहेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल औताडे यांनी दिली.
शनिवार दिनांक ८ ऑगस्ट ते बुधवार दिनांक १२ ऑगस्ट पर्यंत पोहेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्याची अंमलबजावणी झाली होती मात्र पोहेगाव परिसरात २७ कोरोना बाधित रुग्ण सापडले हा आकडा चिंताजनक होता.आज बुधवारी चांदेकसारे येथे पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.त्यामुळे पोहेगाव परिसर अजूनही कोरोना व्हायरस च्या चपाट्यात आहे.पोहेगांव मधील १० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे मात्र अजूनही १७ रूग्नावर कोविड सेंटरमध्ये उपचार चालू आहेत.डॉ. नितीन बडदे यांनी कोरोना संदर्भात कल्पना दिल्यानंतर शिवसेना नेते नितीन औताडे, सरपंच अमोल औताडेे, उपसरपंच प्रशांत रोहमारे ,ग्रामविकास अधिकारी रामदास काळे व पोहेगाव कोरोना दक्षता टीम व आरोग्य यंत्रणेने अजुन चार दिवस पोहेगांव बंद कायम ठेवला आहे.
जीवनावश्यक वस्तू सह सर्व व्यवहार दवाखाना व मेडिकल देखील या बंदामध्ये बंद राहणार आहे. पोहेगाव मधील नागरिकांनी कोरोनाव्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावाची भिती न बाळगता आपल्या कुटुंबाची आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे . विनाकारण कुठेही बाहेर फिरणे टाळावे.दररोज न चुकता सँनिटायझर व मास्कचा वापर करावा.आपली सुरक्षा हाच कोरोनावर उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.