कोपरगावात शुक्रवारी ९ नवे रुग्ण, सध्या ७८ रुग्णांवर उपचार सुरू, ३१ जणांना डिस्चार्ज
कोपरगाव कोरोना अपडेट : २१९९ स्वॅब तपासणी यात ६५२ नगर,१५४७ रॅपिड टेस्ट, १८१५ निगेटिव्ह तर ३८४ पॉझिटिव्ह, ३०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ५ जणांचा मृत्यू, ७८ रुग्णावर उपचार सुरू
कोपरगाव : शुक्रवारी सकाळी २७ जणांच्या नमुन्याची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. यात ८ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.नगर येथे पाठविलेल्या आठपैकी एक जण पॉझिटिव्ह आहे तर ७ जण निगेटिव्ह आले आहेत. व ३१ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी दिवसभरात ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
९ पॉझिटिव्ह रुग्णात : निवारा कॉर्नर१, पढेगाव १, महाविर भवण १,समता नगर २, श्रध्दानगरी १, सुभद्रानगर १, साईप्रभा नगर १ संजीवनी १ यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.





