सरकारने कांदयाला दिलासा देणारे अनुदान द्यावे – स्नेहलता कोल्हे
The government should provide relief grants to onions – Snehalta Kolhe
वृत्तवेध ऑनलाईन। 14 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 16 :05
कोपरगाव : शेतकऱ्यांच्या डोळयात सध्या कांदयाने पाणी आणले असून त्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही प्रकारची कारणमिंमासा न सांगता कांदयाला विशेष अनुदान जाहिर करावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे कृषीमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, मागील सरकारच्या काळात कांदा बाजारभाव घसरणीच्या काळात तत्कालीन सरकारने कांदयासाठी प्रतिक्विंटल दोनशे रूपये अनुदान देउन शेतक-यांना दिलासा देण्याचे काम केले होते.मात्र शेतकऱ्यांच्या डोळयात सध्या कांदयाने पाणी आणले असून त्यांना दिलासा देण्याऐवजी तोकडे अनुदान देवून मदतीचा आव आणत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टाच केली”, असा आरोप तत्कालीन आमदार आणि आजच्या आपल्या सरकारमधील विद्यमान मंत्री यांनी तेंव्हा केला होता.तर कांदयाची किंमत इतकी घसरली असताना सरकार किलोमागे फक्त दोन रुपये अनुदान देवून कसे परवडेल?नाशिकचा कांदा या अनुदानात गुजरात आणि दिल्लीपर्यंत कसा जाईल असा सवाल त्यांनी त्यावेळेस उपस्थित केला होता तेंव्हा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला किती अनुदान द्यायचे हे आता सरकारनेच ठरवावे कोपरखळी सौ.कोल्हे यांनी मारली
गेल्या काही महिन्यापासून जगासह देशभरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव उपस्थित केला होतावाढला असून महाराष्ट्रातही या आजाराचा मोठया प्रमाणात फैलाव झाला आहे, त्यामुळे लाॅकडाऊनमुळे ठप्प झालेल्या बाजारपेठांमुळे शेतक-यांनी पिकविलेल्या माल विक्रीअभावी खराब झाल्याने शेतकऱ्यांना आर्थीक नुकसानीला सामोरे जावे लागले. या आर्थीक विवंचनेतून जात असतांना काढलेले कांदा पिक साठवून ठेवले, त्याचेही नुकसान झाले. सध्याच्या कोसळलेल्या दरामुळे कांदयाला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादनासाठी केलेल्या खर्चाच्या निम्मा खर्चही पदरात पडला नाही. प्रतिकुल हवामानामुळे कांदा पीक सांभाळणे जिकरीचे होउन बसल्याने मातीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे. अशा चोहोबाजुने संकटात सापडलेल्या शेतक-यांना सरकारने दिलासा देण्यासाठी कांदयाला अनुदान जाहिर करावे . अशी मागणी सौ.कोल्हे यांनी शेवटी केली आहे.