वीज बिल माफ करा, नाहीतर ७ रूपये युनिट दराने बिल आकारा – मनसे
कोपरगाव :
कोपरगाव मनसेच्या वतीने वीज वितरण कार्यालयात जाऊन गेल्या तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे थ मागिल युनिट प्रमाणे ७ ते ७.५० रूपया प्रमाणे बिल आकारण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
देशात कोरोनाचे संकट असताना लाॅकडाऊन करण्यात आले. या लाॅकडाऊन मध्ये शासनाचे नियम पाळत सर्व जनता घरात बसून होती.या लाॅकडाऊन काळात घरात फ्रीज,फॅन ,एसी मोबाईल अशा इलेक्ट्रिक वस्तूचा वापर वाढल्या होत्या.
या बंदच्या काळात वीज बिले वाटण्यात आली नाही. रिडिंग घेतले नाही. आता तीन महिन्याचे एकत्रित बिल देण्यात आले आहे. लाॅकडाऊनच्या पूर्वी प्रमाणे ७ ते ७.५० रुपयाप्रमाणे युनिट दर आकरणे अपेक्षित असताना १०.५०ते ते ११ रुपयाप्रमाणे युनिट आकारल्यामुळे वीज बिल मोठ्या रक्कमेची झाली आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहे.
तिन महिन्याचे वीज बिल माफ करावे किंवा मागील युनिट प्रमाणे बिल आकारावे .या बाबत ठोस निर्णय आठ दिवसांत घेण्यात यावा.अन्यथा वीज बिलाची होळी वीज वितरण कार्यालया समोर करण्यात येईल, असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.या
पत्रकावर शहराध्यक्ष सतिष काकडे ,माजी तालुकाध्यक्ष आलिम शहा, अनिल गाडे, विजय सुपेकर, रघुनाथ मोहिते, बंटी सपकाळ ,नितिन त्रिभुवन, जावेदभाई शेख, सचिन खैरे, आंनद परदेशी, संजय जाधव, बापु काकडे,नवनाथ मोहिते आदींच्या यांच्या सहया आहेत.