फोटोग्राफीचे दर वाढणार संघटनेची माहिती

फोटोग्राफीचे दर वाढणार संघटनेची माहिती

कोपरगाव :

गेल्या अनेक वर्षांपासुन छायाचित्रण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत आहेत. निगेटिव्ह कॅमेरा बंद होऊन त्याची जागा मेमरी कार्डने घेतली आहे. त्यामुळे छायाचित्रकारांचे खर्च वाढत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासुन छायाचित्रणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात झालेली भरमसाठ वाढ , पेट्रोल दरवाढ, वाढलेले जागा भाडे, वाढलेले वीज दर यामुळे छायाचित्रकार अडचणीत आला आहे. या सर्व बाबींचा विचार करता कोपरगाव तालुक्यातील छायाचित्रकारांनी १ जुलै पासुन दरवाढ करण्याचे ठरवले आहे.

याबाबत नुकतीच ऑनलाइन बैठक संपन्न झाली असुन हे दर तालुक्यातील सर्व छायाचित्रकारांनी मान्य केले असल्याचे एक प्रसिद्धी पत्रक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

या वेळी संजय भवर , संतोष कामतकर, प्रविण आभाळे ,अविनाश निकम, महेश नाईक, श्रीकांत माळी, अभय गोर्डे, सागर पवार, श्रीकांत नरोडे ,कदम आदी छायाचित्रकांनी चर्चेत सहभाग नोंदवला .

Leave a Reply

You cannot copy content of this page