घोटी त्रंबकेश्वरला पावसाचे दमदार कमबॅक; गोदावरी तिसऱ्यांदा दुथडीने वाहते
५९ दिवसांच्या विश्रांतीनंतर १६,८६४ क्यून्सेक्सने विसर्ग
वृत्तवेध ऑनलाईन। 14 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 18 :25
कोपरगाव : जुलै महिना पूर्णपणे पावसाने ओढ दिल्याने नाशिक भागात पावसाळा कोरडा गेला. मात्र १२ व १३ ऑगस्ट रोजी पावसाचे कमबॅक झाल्याने, घोटी त्र्यंबकेश्वरला पाऊस पडता झाल्या. गोदावरी नदीला तिसऱ्यांदा दारणा धरण समूहातून नांदूर मधमेश्वर बंधारा १६,८६४ क्यून्सेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदी एकूण ५९ दिवसांच्या विश्रांतीनंतर तिसऱ्यांदा वाहती झाली आहे. यापूर्वी ४ व १४ जून रोजी पाणी सोडण्यात आले होते. गोदावरी खोऱ्यातून यंदाच्या हंगामात जायकवाडीला चांगले पाणी गेल्याने समन्यायी पाणीवाटपाचा तडाखा चालूवर्षी बसणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडी करण्याकडे भर दिला आहे. भावली धरण पूर्णपणे तर दारणा ९२ टक्के भरले आहे.
गुरुवारी पडलेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये तर कंसातील आकडेवारी आज पर्यंत आहे.
दारणा ६० (६७०) गंगापूर ६७ (११५३), मुकणे ५५(६३४), कडवा ३५(६४५) काश्यपी ३३ (५५८) भावली १६२ (२६३१) वालदेवी ३६ (४३३), गौतमी ४८ (६७८), वाकी ७०(१३८०), नांदूर मधमेश्वर १० (५१४) नाशिक ३८ (६९१), त्र्यंबकेश्वर ११० (८८९), घोटी ९३ (१२१३), इगतपुरी १२० (२३२१), देवगाव १५ (५८९), ब्राह्मणगाव १४ (४८४), कोपरगाव ११ (५८८), पडेगाव ५ (५१५), सोमठi नI १८ (४०४), कोळगाव २० (४५८), शिर्डी १३ (४५३), सोनेवाडी ९(३१९), रां ज न गाव १५ (५२९), चितली १० (५२३), रा ह ता १४ (६४७), गोदावरी उजवा १०० क्यूसेक्स वेगाने सध्या वाहत आहेत. तर दारणा ६६१६, गंगापूर ३७६८, मुकणे ३६६०,, कडवा १०३०, काशपी ५९०, भावली १४३४, गौतमी ७५०, वाकी धरणात ९६७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. यापूर्वी गोदावरी नदीला ४ जून रोजी १६२२० पाणी सोडण्यात आले होते आज स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे त्यात करूनच मोठे सावट आहे त्यामुळे नदीचे पाणी पाहण्यासाठी सामाजिक अंतर ठेवत नागरिकांनी काही प्रमाणात गर्दी केली होती गंगापूर धरण समूहावर सिंचन अवलंबून असून यांना पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते मात्र पावसाने दमदार कमबॅक केलं आणि शेतकऱ्यांचे चेहरा आनंदी झाले आहेत कोपरगाव ते पाऊस पडला झाल्याने सोयाबीन उत्पादक मात्र चिंतेत आहेत.