बहादराबाद उपसरपंच कोल्हे गटाच्या सौ. शिलाबाई पाचोरे बिनविरोध

बहादराबाद उपसरपंच कोल्हे गटाच्या सौ. शिलाबाई पाचोरे बिनविरोध

वृत्तवेध ऑनलाईन। 14 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 17 :05

कोपरगाव : भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असलेल्या बहादराबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ शिलाताई अशोक पाचोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच निवडीकरीता आज पार पडलेल्या सभेत उपसरपंचपदी सौ शिलाताई अशोक पाचोरे यांच्या नावाची सूचना गोवर्धन पाचोरे यांनी मांडली तर अनुमोदन सदस्य सौ संगिता पाचोरे यांनी दिले. सरपंच विक्रम पाचोरे यांच्या अध्यक्षस्थानी पार पडली तर सचिव म्हणून ग्रामसेविका सौ अनिता दिवे यांनी काम पाहिले.

मावळते उपसरपंच गोवर्धन बन्सी पाचोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. यावेळी साहेबराव पाचोरे, विकास सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय पाचोरे, माजी सरपंच दतात्रय पाचोरे, पोलीस पाटील आप्पाासाहेब पाचोेरे, आण्णासाहेब पाचोरे,अशोक पाचोरे, लक्ष्मण पाचोरे, दिलीप पाचोरे, बाळासाहेब पाचोरे, वाल्मीक पाचोरे, रामनाथ पाचोरे, संदीप पाचोरे, दिपक आरोटे, निलेश पाचोरे,उपस्थित होते. या निवडीबददल माजी मंत्री शंकररावजी कोल्हे, संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे, कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन विवके कोल्हे यांनी नवनिर्वाचित उपसरपंचाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page