कोपरगाव शनिवारी १८ नवे रुग्ण, ७८ रुग्णांवर उपचार सुरू, १९ जणांना डिस्चार्ज
वृत्तवेध ऑनलाईन | 15 Aug 2020, By : RajendraSalkar 15:00
कोपरगाव कोरोना अपडेट : २२५६ स्वॅब तपासणी यात ६६२ नगर,१५९४ रॅपिड टेस्ट, १८५३ निगेटिव्ह तर ४०३ पॉझिटिव्ह, ३२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ५ जणांचा मृत्यू, ७८ रुग्णावर उपचार सुरू
कोपरगाव : शनिवारी सकाळी ४७ जणांच्या नमुन्याची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. यात १८ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. व १९ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. शनिवारी दिवसभरात १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
१८ पॉझिटिव्ह रुग्णात : निवारा कॉर्नर २, पढेगाव ३, समता नगर ६, संजीवनी १, इंदिरा पथ २, विवेकानंदनगर ३ , औद्योगिक वसाहती १ यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.