उजनी चारी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित ; आ. आशुतोष काळेंची वचनपूर्ती

उजनी चारी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित ; आ. आशुतोष काळेंची वचनपूर्ती

वृत्तवेध ऑनलाईन | 15 Aug 2020, By : RajendraSalkar 16:30

कोपरगाव : रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य ठरविणारी उजनी चारी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित  करून आ. आशुतोष काळे यांनी निवडणुकीतील शब्दाची वचनपूर्ती केली आहे अशी माहिती आमदार संपर्क  कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

२०१४ पासून बंद होती. ती अल्प कालावधीतच सुरू  करून या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलविले आहे. या योजनेच्या धोंडेवाडी येथील पाझर तलावात पाणी साठविणे सुरु झाले असून या पाण्याचे जलपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले आहे.

यावेळी बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील जिरायती भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी माजी आ. अशोकराव काळे यांनी २००४ पूर्वी बंद पडलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. २००५ साली विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवत हि योजना सुरु करून पश्चिम भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. हि योजना अविरतपणे सुरु रहावी यासाठी पदरमोड करून वीजबिल देखील ते स्वत: भरीत होते. त्यांनी २०१४ पर्यंत हि योजना सुरु ठेवल्यामुळे या भागातील शेती सिंचनासाठी उजनी चारी उपसा जलसिंचन योजना वरदान ठरली होती. मात्र दुर्दैवाने २०१४ नंतर या योजनेकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्यामुळे या भागातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी या भागातील नागरिकांना आपण उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करू असे वचन दिले होते. दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी निवडून आल्यापासून ही योजना सुरू करण्यासाठी वारंवार जलसंपदा मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करीत होतो. हि योजना सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सर्व दुरुस्त्या वेळेत पूर्ण करून घेतल्याने उजनी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरू करून दिलेला शब्द पूर्ण केला याचे खूप मोठे समाधान वाटत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. भविष्यात या योजनेला २४ तास वीज मिळावी यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला असून ऊर्जा खात्याकडे त्याबाबत पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ज्याप्रमाणे माजी आमदार अशोकराव काळे यांनी २००४ पूर्वी बंद पडलेली योजना पुन्हा सुरु केली त्याप्रमाणे आपल्या वडिलांचा कित्ता गिरवून आशुतोष काळे यांनी हि योजना पुन्हा कार्यान्वित केल्यामुळे काळे परिवाराचे पाणी प्रश्नाचे नाते किती जवळचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे योजनेच्या पाझर तलावांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली असून आमदार आशुतोष काळे यांनी हा प्रश्न तातडीने सोडवल्याबद्दल या आठही गावातील व परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, जवळकेचे सरपंच बाबुराव थोरात, रोहिदास होन, किसन पाडेकर, के.डी. खालकर,अॅड. योगेश खालकर, सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, अनिल खालकर, अरुण कोल्हे, लक्ष्मण थोरात, नाना नेहे, ज्ञानदेव नेहे, प्रभाकर गुंजाळ, युवराज गांगवे, सिकंदर इनामदार, अशोक नेहे, वाल्मिक वाकचौरे, दिलीप जुंधारे,आनंदा भडांगे,भरत रानवडे,निळवंडे लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता गिरीश संघांनी, विवेक लव्हाटे, ढिकले आदी उपस्थित होते.

चौकट – २००४ पूर्वी उजनी चारी उपसा जलसिंचन योजना बंद पडली ती  माजी आमदार अशोकराव काळे यांनी  २०१४ पर्यंत कार्यान्वित ठेवली. मात्र २०१४ नंतर हि योजना पुन्हा बंद पडली. मागील पाच वर्षात जिवंतपणी सरणावर बसण्याची वेळ आली होती.  २०२० साली आमदार आशुतोष काळे यांनी  या भागाची जीवनवाहिनी असलेलीं हि योजना सुरु केल्यामुळे काळे परिवाराकडून परत एकदा पश्चिम भागाला जीवदान मिळाले असून दिलेले वचन पूर्ण करून बोले तैसा चाले हे आमदार आशुतोष काळे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. – बाबुराव थोरात अध्यक्ष, उजनी चारी उपसा जलसिंचन योजना.

Leave a Reply

You cannot copy content of this page