स्वातंत्र्यदिनी आमदार काळेंनी केला कोरोना योध्दांचा सन्मान
त्यांचे योगदान विसरता येणार नाही
वृत्तवेध ऑनलाईन | 15 Aug 2020, By : RajendraSalkar 19 :30
७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसील कार्यालयात आमदार आशुतोष काळे यांनी कोरोना साथीच्या काळात सामाजिक कार्य आणि सेवा करणा-या करोना योद्धांचा गौरव केला.
प्रारंभी स्वातंत्र्यदिनानिमित्त आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आशुतोष काळे म्हणाले, कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी डॉक्टर्स, पोलीस प्रशासन, आरोग्य सेविका, आशा सेविका, नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, महसूल कर्मचारी तसेच सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य अजोड आहे. त्यांचे आरोग्य अबाधित राहणेसाठी सर्व संरक्षक साहित्याची वेळेत उपलब्धतता करून दिली. स्वत:हाची व आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस न थकता त्यांनी घेतलेले कष्ट व केलेल्या अपार मेहनतीमुळे तालुक्यात कोरोनाला निश्चितपणे काही अंशी नियंत्रनात ठेऊ शकलो असून कोरोनाला रोखण्यात कोरोना योद्धयांनी दिलेले योगदान कोपरगावकर कधीही विसरू शकत नाही. तेंव्हा सर्व नागरिकांप्रमाणे सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार काळे यांनी शेवटी केले.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अर्जुन काळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी संतोष विधाते तसेच सर्व समानार्थी कोरोना योद्धे, धोंडीराम वक्ते, संदीप वर्पे, शिरीष लोहकणे, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, बाळासाहेब कडू, बाळासाहेब रुईकर, अंबादास वडांगळे, विजय चवंडके, बाळासाहेब देवकर आदी उपस्थित होते.
सर्व नागरिकांप्रमाणे सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी शेवटी केले.