समृध्दी सर्कलसाठी संपादित जमिनींना जास्त मोबदला द्या – आ. आशुतोष काळे

समृध्दी सर्कलसाठी संपादित जमिनींना जास्त मोबदला द्या – आ. आशुतोष काळे

वृत्तवेध ऑनलाईन | 17 Aug 2020, By : RajendraSalkar 17:00

कोपरगाव : समृद्धी महामार्गावर जेऊर कुंभारी व कोकमठाण येथे नगर बडबड महामार्गावरील प्रस्तावित सर्कलसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी अडचणी संबंधित तहसील कार्यालयातील आयोजित बैठकीत महसूल विभागाला दिल्या आहेत.

यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार कोतवाल कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, धोंडीराम वक्ते, सचिन आव्हाड, दिलीप शिंदे, सुनील बोरा, वसंतराव आव्हाड, रामनाथ आव्हाड, विजय रोहोम, डॉ. यशराज महानुभाव, डॉ. ओंकार जोशी आदींसह प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.

जेऊर कुंभारी व कोकमठाण हा परिसर पूर्णपणे बागायती असतांना देखील सात बारा उताऱ्यावर मात्र जिरायती लावण्यात आले आहे. प्रस्तावित सर्कलसाठी ज्यावेळी मोजणी करण्यात आली त्यावेळी सदर शेतामध्ये ऊसाचे पिक होते व आज रोजी त्या शेतात सोयाबीनचे पिक असल्यामुळे जिरायती नोंद न घेता बागायती नोंद घेवून बागायती जमिनीचा दर मिळावा. प्रस्तावित सर्कलसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत व त्या शेतकऱ्यांकडे जे एक ते पाच गुंठे जमीन शिल्लक राहत असले तर ती शेतजमीन देखील खरेदी करावी. जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जोपर्यंत सर्कलचे काम सुरु होत नाही तोपर्यंत संपादित शेत जमिनीमध्ये पिक घेण्यास परवानगी द्यावी, मागण्या व येत असलेल्या अडचणी लवकरात लवकर दूर करून त्यांच्या जमिनीचे योग्य मूल्य प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना तातडीने मिळावे यासाठी प्रयत्न करावे,सर्कलसाठी कोणत्या शेतकऱ्यांचे किती क्षेत्र जाणार व कुठले जाणार याची माहिती द्यावी व सर्वच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून द्यावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page