कोपरगाव रविवारी २१ नवे रुग्ण, ९५ रुग्णांवर उपचार सुरू, ४ जणांना डिस्चार्ज
वृत्तवेध ऑनलाईन | 16 Aug 2020, By : RajendraSalkar 16:00
कोपरगाव कोरोना अपडेट : २३०२ स्वॅब तपासणी यात ६७२ नगर,१६३० रॅपिड टेस्ट, १८७८ निगेटिव्ह तर ४२४ पॉझिटिव्ह, ३२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ५ जणांचा मृत्यू, ९५ रुग्णावर उपचार सुरू
कोपरगाव : रविवारी सकाळी ३६ जणांच्या नमुन्याची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. यात १६ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नगर येथे दहा जणांचे नमुने पाठविले असता त्यापैकी पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तर पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत व ४ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. रविवारी दिवसभरात २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
२१ पॉझिटिव्ह रुग्णात : साईनाथ नगर १, संजीवनी वसाहत १, समता नगर १,सिद्धिविनायक नगर १, कुलस्वामिनी कार्यालय २, कृषी मित्र सोसायटी २, विवेकानंदनगर ३ गोदाम गल्ली ३, गांधीनगर १, जोशी नगर १, सोनेवाडी १, राजपाल सोसायटी १, चांदेकसारे १, टिळकनगर १, इंदिरा पथ १, यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली