गोदावरी बायोरिफायनरीचे माजी संचालक पी. के.आर. नायर यांचे निधन

गोदावरी बायोरिफायनरीचे माजी संचालक पी. के.आर. नायर यांचे निधन

वृत्तवेध ऑनलाईन | 17 Aug 2020, By : RajendraSalkar 17:38

कोपरगाव : सोमय्या उद्योग समूहाचे अध्यक्ष समीरशेठ सोमैया , गोदावरी बायोरिफायनरी संचालक एस. मोहन,
उपमहाव्यवस्थापक मधुकर दराडे
यांनी गोदावरी बायो रिफायनरीचे माजी संचालक पी. के.आर. नायर
यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

के. पी. के. रविंद्रन नायर, ज्यांचा जन्म १९३४ साली कोल्लम, केरळ येथे झाला होता. त्यांनी गोदावरी बायोरिफाइनरेस लि. साकरवाडी येथे ४० वर्षे नोकरी केली. काम करताना आपल्या हुशारी मेहनतीतून त्यांनी संचालक पदापर्यंत मजल मारली होती. त्यांना अनूप नायर अनिल नायर दोन मुले व डॉ. अनिता नायर-यूएसए. एक मुलगी आहे. सेवानिवृत्तीनंतर ते पुणे येथील कोरेगाव पार्क येथे राहत होते. रविवारी पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कोरेगाव पार्क इलेक्ट्रिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या निधनाबद्दल सोमवारी गोदावरी बायो रिफायनरी साकरवाडी येथे कामगारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page