कोपरगाव सोमवारी ३३ नवे रुग्ण, ११९ रुग्णांवर उपचार सुरू, ७ जणांना डिस्चार्ज

कोपरगाव सोमवारी ३३ नवे रुग्ण, ११९ रुग्णांवर उपचार सुरू, ७ जणांना डिस्चार्ज

वृत्तवेध ऑनलाईन | 17 Aug 2020, By : RajendraSalkar 17:40

कोपरगाव कोरोना अपडेट : २३८७ स्वॅब तपासणी यात ६६२ नगर,१७२५ रॅपिड टेस्ट, १९३० निगेटिव्ह तर ४५७ पॉझिटिव्ह, ३३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ७ जणांचा मृत्यू, ११९ रुग्णावर उपचार सुरू

कोपरगाव : सोमवारी सकाळी ९५ जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात ३२ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर ६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नाशिक येथे एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर सात जणांना घरी पाठविण्यात आले आहे. सोमवारी दिवसभरात ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

३३ पॉझिटिव्ह रुग्णात : सप्तर्षी मळा१, गजानन नगर १, सुभद्रानगर १, टिळकनगर ३, देर्डे १, बँक रोड १,संजीवनी कारखाना २, खडकी १, निवारा २, ब्राह्मणगाव १, धारणगाव रोड २, सुरेगांव १, दत्त नगर १, गांधीनगर १, विवेकानंदनगर २, टाकळी रोड १,जेऊर कुंभारी १, कुळस्वामिनी मंगल कार्यालय जवळ ३, राम मंदिर रोड १, पोलिस कॉलनी ३,यशवंत चौक २,शहाजापूर १, यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page