उजनी योजना: काळेंचा डाव फसल्याने, कोल्हेंच्या नावाचा खोटा कांगावा – सौ. शोभा दरेकर

उजनी योजना: काळेंचा डाव फसल्याने, कोल्हेंच्या नावाचा खोटा कांगावा – सौ. शोभा दरेकर

पलटवार

वृत्तवेध ऑनलाईन | 17 Aug 2020, By : RajendraSalkar 19:40

कोपरगाव : सध्या परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने नैसर्गिकरित्या भरलेल्या साठवण तलावाच्या पाण्यावर बटन दाबून आपली राजकीय पोळी भाजण्याचा विद्यमान आमदारांचा डाव फसल्याने, कार्यकर्त्यांच्याकरवी कोल्हेंच्या नावाचा खोटा कांगावा सुरु केला असल्याचा पलटवार धोंडेवाडी सरपंच सौ. शोभा ज्ञानेश्वर दरेकर यांनी केला आहे.

उजनी उपसा जलसिंचन योजना

उजनी चारी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर उजनी योजनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टीकेनंतर कोल्हे गटाने पलटवार केला आहे. थोरात यांनी माजी आमदार सौ. कोल्हे यांच्यावर टीका करताना मध्यंतरीच्या १० वर्षाच्या काळात मतदार संघाला लाभलेल्या निष्क्रीय आमदारांच्या काळात या योजनेकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले, त्यामुळे या भागातील शेतक-यांच्या आनंदावर विरजण पडले होते, आणि याची चिंता त्यांना असायला हवी होती, अशा शब्दांत सरपंच शोभा दरेकर यांनी थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

जनता सुज्ञ असुन त्यांना सर्व वस्तुस्थिती ज्ञात आहे, त्यामुळे कायमच दिशाभुल करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व खोटे भासविण्याचा डाव आखला, परंतू त्यांचा हा खोटा डाव फसल्याने त्यांनी आता माजी आमदार सौ. कोल्हे यांनी योजना बंद पाडल्याचा खोटा कांगावा सुरू केला असल्याचे सौ. दरेकर म्हणाल्या.

जिरायत भागातील शेतक-यांचा पाटपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी उजनी उपसा सिंचन योजना मंजुर करून आणली, सौ. स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात पाठपुरावा केला, आणि ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले, पाणीही योजनेपर्यंत पोहचविण्याचे काम केले होते, ही वस्तुस्थिती असतांना विद्यमान आमदारांनी निसर्गाच्या कृपेने साठलेल्या पाण्याचा (गैर) फायदा घेऊन फक्त बटण दाबण्याचा फोटो काढून उजनी उपसा योजना चालू केल्याचा देखावा केला असल्याची टीका सौ. दरेकर यांनी केली .

Leave a Reply

You cannot copy content of this page