नाशिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांना  राष्ट्रपती पदक

नाशिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांना  राष्ट्रपती पदक

Senior Police Inspector Sanjay Sangale President’s Medal

वृत्तवेध ऑनलाईन | 18 Aug 2020, By : RajendraSalkar 18:30

कोपरगाव : स्वातंत्र्यदिनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे प्रशिक्षण शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चांगदेव सांगळे यांना आंतरिक सुरक्षा यासाठी राष्ट्रपती पदक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त विश्वासराव नांगरे पाटील  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे व सौ मनीषा सांगळे

यावेळी पोलिस आयुक्त विश्वासराव नांगरे पाटील,विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक डॉ छरींग दोरजे, पोलीस ॲकॅडमी संचालक अश्वती दोरजे, नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे आदी हजर होते.

यावेळी बोलताना राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक संजय सांगळे म्हणाले, मी कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील राहणारा असून १९९० मध्ये मी पोलिस दलात रुजू झालो. नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली येथे स्वेच्छेने मी वयाच्या पन्नासाव्या वर्षी रुजू झालो. या वयात अशा दुर्दम्य भागात रुजू होणारा मी एकमेव व्यक्ती होतो. नक्षलग्रस्तांचा गड असलेल्या अति संवेदनशील अशा भामरागड पोलिस ठाण्यात मी तैनात होतो, मला तीन वर्षांची सेवा देण्यात आली होती. परंतु मी तिथे स्वतःहून ४ वर्षे सेवा केली होती.
या माझ्या चार वर्षाच्या कार्यकाळात १६ वेळेस नक्षलवादी व आमच्यात समोरासमोर गोळीबार झाला. दोन वेळा झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये मी नशिबाने सुखरूप बचावलो. या ठिकाणी असलेल्या १२ नक्षलवाद्यांच्या डोक्यावर सुमारे एक कोटीचे बक्षीस सरकारने लावले होते. पुढे या बारा जणांनी सरकार पुढे शरणागती पत्करली. याप्रकरणी माझा मोठा सहभाग असल्याचा मला अभिमान आहे. मी नक्षलवादी भागांमध्ये पोलीस दलात राहून जी सेवा बजावली, त्याची दखल घेत मला देशाच्या राष्ट्रपतींनी अंतर्गत सुरक्षेसाठी राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित केले याचा मला अतिशय आनंद होत असल्याचे मत राष्ट्रपती पदक विजेते संजय सांगळे यांनी आमच्या प्रतिनिधीला जवळ व्यक्त केले .

Leave a Reply

You cannot copy content of this page