सरकारला बळीराजांच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही ; लढा तीव्र करणार – सौ. स्नेहलता कोल्हे

सरकारला बळीराजांच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही ; लढा तीव्र करणार – सौ. स्नेहलता कोल्हे

महादूध एल्गार : २० हजार पत्र धाडणार

वृत्तवेध ऑनलाईन | 19 Aug 2020, By : RajendraSalkar 16 :00

कोपरगाव : शेतकरी बांधवांच्या संवेदनाची कदर न करणा-या राज्य सरकारला जागे करून दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांचे स्मरणपत्र पाठवून महादूध आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारला बळीराजांच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने भाजपा महायुती हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी दिला आहे.

दुध उत्पादक शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंञ्यांना पत्रे पाठविण्याच्या महादूध एल्गार आंदोलनाची सुरूवात सौ कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथील टपाल कार्यालयात करण्यात आली. जिल्हयातून सुमारे २० हजार पत्र पाठविण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हयाचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शरदराव थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष कैलास खैरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव, महिला आघाडीच्या योगिता होन, शिल्पा रोहमारे, विजयराव आढाव, महावीर दगडे, दत्ता काले, दिपकराव गायकवाड, सतिष केकाण, भिमा संवत्सरकर, कोंडाजी दरगुडे, प्रभाकर शिंदे, सखाराम शिंदे, अशोक शरमाळे, अशोक पवार, कैलास सानप, शहाजादी पठाण, चंद्रभान शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी सौ कोल्हे म्हणाल्या की, सध्याच्या कोरोना परिस्थीतीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, कांदयाचे भाव कोसळल्यामुळेही शेतकरी अडचणीत आहे, अशा विविध संकटाचा सामना करीत असलेल्या बळीराजावर दुःखाचे सावट आहे, परंतू राज्यातील निष्क्रीय सरकार शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.
दुधाचे दर एवढे कमी नसतांनाही माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दूधाला ५ रूपये प्रतिलिटर अनुदान खात्यावर जमा केले होते. त्या वेळच्या पेक्षाही दुधाला दर कमी असुन ही हे सरकार काही करत नाही.

दूधाला ३० रूपये प्रतिलिटर भाव दयावा, प्रतिलिटर १० रूपयाचे अनुदान आणि भुकटीला ५० रूपये प्रतिकिलो अनुदान दयावे या मागणीसाठी एक महिन्यापुर्वी शेतकरी बांधव रस्त्यावर उतरला, तरीही या सरकारला शेतक-यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आलेले नाही, ही दुर्दैवाची बाब असून या शेतक-यांच्या संवेदनाची कदर न करणा-या सरकारला जाग आणण्यासाठी हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचे सौ कोल्हे म्हणाल्या.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोेंदकर यावेळी म्हणाले की,
विसरभोळया सरकारला शेतक-यांच्या दुःखाचा विसर पडलेला आहे. शेतकरी बांधवांना त्यांच्या प्रश्नासाठी पुन्हा स्मरणपत्र पाठविण्याची वेळ
शेतक-यांवर आली असल्याची टिका
गोेंदकर यांनी करुन ते पुढे म्हणाले की,
कोपरगाव मतदार संघात माजी आमदार सौ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडया वस्त्यावर कोरोनाच्या काळातील नियम अटींचे पालन करून पत्र पाठविण्याची मोहिम राबविण्यात येणार असून दूध उत्पादकांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक भूमिका घेईल, अशी अपेक्षा होती,
परंतु तसे होतांना दिसत नाही, त्यामुळे या निद्रीस्त सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे गोंदकर म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page