स्वातंत्र्यदिनी‘संजीवनी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम’ लॉन्च – अमित कोल्हे
आठ हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण
वृत्तवेध ऑनलाईन | 18 Aug 2020, By : RajendraSalkar 18:30
कोपरगांव: संकटं आली की मानव त्यावर पर्याय शोधतो हे अनादी कालापासुन चालु आहे. मार्चच्या मध्यावर कोरोना व्हायरस भारतात आला आणि प्रत्येक क्षेत्रातील दैनंदिन कारभाराबरोबर शिक्षणाची घडी विस्कटली. यासाठी ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे निश्चित झाले. यावर संजीवनीच्या प्राद्यापकांनी ‘संजीवनी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम’ (एसएलएमएस) ही शिक्षण प्रणाली विकसीत केली. आज ८००० पेक्षा जास्त विध्यार्थी वेळापत्रकानुसार ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, या प्रणालीचे उद्घाटन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी करण्यात आले, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, संजीवनी अंतर्गत विविध संस्थांचे प्राचार्य हे सर्व कोविड १९ चे मार्गदर्शक तत्वे पाळुन उपस्थित होते.
अमित कोल्हे म्हणाले, संजीवनीच्या इंजिनिअरींग, एमबीए, बीबीए, फार्मसी, पाॅलीटेक्निक, ज्युनिअर व सिनिअर काॅलेज, सैनिकी स्कूल, संजीवनी अकॅडमी, संजीवनी इंटरनॅशनल स्कुल अशा कोपरगांव, वैजापुर व शिर्डी येथिल सर्व संस्थांमधिल विध्यार्थ्यांना सर्व शिक्षक, ऑनलाईन शिक्षण देत आहे. सुरूवातीस एसएलएमएस या शिक्षण प्रणालीत व्हीडिओ लेक्चर्स अपलोड करण्यात आले. प्रत्येक विध्यार्थास लाॅगईन साठी युझर आयडी व पासवर्ड देण्यात आला. त्यानुसार विध्यार्थी व्हीडिओ लेक्चर्स त्यांच्या मोबाईल वर अथवा लॅपटाॅप वर केव्हाही पाहुन ऐकु शकतात. याच लेक्चर्सवर पुन्हा संबंधित विषय शिक्षक ऑनलाईन लेक्चर्स देतात व विध्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करतात. जसा वर्गात शिक्षक व विध्यार्थी एकमेकाशी संवाद साधतात, तसाच संवाद ऑनलाईन लेक्चर्स मध्येही साधला जातो. याचबरोबर विध्यार्थ्यांच्या अभ्यासाठी लागणाऱ्या नोटस्, इत्यादी एकाच प्रणाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी कोणत्याही विशिष्ट मोबाईल app ची किंवा साॅफ्टवेअरची गरज नाही. विशेष म्हणजे विद्यार्थ्याने व्हीडिओ लेक्चर किती वेळ पाहीले व ऑनलाईन लेक्चर किती वेळ ऐकले, याची अचुक नोंद हे साॅफ्टवेअर करते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीची आपोआपच नोंद होते. आपला पाल्य मोबाईल अथवा लॅपटाॅप वर काय करीत आहे, याची शहानिशा पालक लागलीच करू शकतात. विध्यार्थी आपल्या शंका चॅट बाॅक्स मार्फतही विचारू शकतात. गृहपाठ देणे, ते तपासणे, इत्यादीही या साॅफ्टवेअर मार्फत केले जाते. या साॅफ्टवेअरमध्ये ऑनलाईन चाचण्या घेण्याचीही तरतुद करण्यात आली आहे. एखादा विध्यार्थी पुस्तकात पाहुन चाचणी परीक्षांचे प्रश्न सोडवेल अशी शंका साहजिकच कोणाच्याही मनात येईल, मात्र तसे केल्यास सदर विध्यार्थ्यांच्या हालचाली मोबाईलच्या कॅमेऱ्या मध्ये कैद होत असतात आणि संबंधित विषय शिक्षकाला दिसत असतात. अशा आगळ्या वेगळ्या संजीवनी एलएमएस शिक्षण प्रणालीमुळे सध्या संजीवनीचे हजारो विध्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असुन कोणत्याही प्रतिकुल परीस्थितीवर मात करून त्यावर विजय मिळविणे हे संजीवनीचे वैशिष्ट्य आहे.
सर्व संस्थांचे प्राचार्य, प्रा. डाॅ. अनिल पवार, प्रा. चैतन्य काळे व प्रा. साईप्रसाद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध संस्थांचे समन्वयक या यंत्रणेमध्ये कार्य करीत असुन संपुर्ण शिक्षण प्रणाली व्यवस्थित चालु असुन नाविण्याचा शोध घेत संजीवनीने कोविड १९ च्या काळात एक क्रांतिकारी पावुल टाकले आहे, असे श्री कोल्हे यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.