बिबट्याची दहशत पिंजरा लावून बिबट्या अडकेना

बिबट्याची दहशत पिंजरा लावून बिबट्या अडकेना

वृत्तवेध ऑनलाईन। 21 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 12 :35

कोपरगाव : एकीकडे कोरोनाच्या दहशतीमुळे नागरीक भयभीत झाले असतांना तालुक्यातील सुरेगाव शिवारात अजय कुलकर्णी यांच्या शेतात उसाच्या शेतामध्ये दोन बिबट्यांना जाताना नागरिकांनी पाहिले नागरीकांवर बिबट्याच्या दहशतीचे दुहेरी संकट आले आहे. गेल्या काही दिवसापासून बिबट्या पशुधनांवर हल्ले करीत आहे. आता नागरीकांनाही या बिबट्याचे राजरोसपणे दर्शन होवू लागल्याने नागरीकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.या भागात पिंजरे लावून तात्काळ बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली आहे.

अजय कुलकर्णी यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावला

दोन दिवसापूर्वी बिबट्यांच्या झडपेने दोन शेळ्या जखमी झाल्या, एक कोल्हा व २०-२५ कोंबड्या मारल्या. दहशतीचे वातावरण अद्यापही आहे. ग्रामस्थांनी भविष्यातील धोका ओळखून या भागात पिंजरे लावून तात्काळ बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली आहे. त्याप्रमाणे वनविभागाने या ठिकाणी लावले आहेत परंतु अद्याप या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकलेला नाही

सुरेगाव शिवारात अनेक दिवसापासून बिबट्या पुन्हा सक्रीय झाला आहे.शेतात बांधलेल्या अनेक पशुधनांवर त्याने हल्ले केला त्यात २ शेळ्या जखमी झाल्यात तर एका कोल्ह्याचा त्यांनी फडशा पाडला. मागील दोन महिन्यापासून सुरेगाव व परिसरातील सुरेख गावाच्या शेतीशिवारात बिबट्याचा वावर सुरु आहे.
गुरूवारी २० रोजी सायंकाळी ७ वाजता अचानक शेतामध्ये कोलाहल माजला, पक्षांचा गोंगाट सुरु झाला, कुत्र्यांचे भुंकणे व कोंबड्यांचा कलकलाट वाढला, कोल्हेकुई सुरु झाली, माणसे सैरावैरा पळू लागली. दोन बिबटे उसामध्ये गेल्याचे कळले
त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बिबट्याने आतापर्यंत तरी मनुष्यांवर हल्ला केलेला नसला तरी भविष्यातील धोका ओळखून या भागात ताबडतोब बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत वनविभागाने लावला असून अध्याप बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाही

कोरोनाची आणि बिबट्याची भीती
गेल्या महिन्यापासून कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे पहीलेच ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.नागरीकांना घरातच थांबून राहण्याचे आवाहन केले जात असले तरी शेतीचे दिवस असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना घरात बसून राहणे परवडणारे नाही. त्यामुळे सोशल डिस्टिन्सींग पाळून शेतकरी, शेतमजुर शेतात जात आहेत. मात्र आता दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होवू लागल्याने सुरेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राणी शहरी भागात व भर वस्तीमध्ये दिसायला लागलेत. सृष्टीचे कालचक्र (ecology cycle) बदलल्याची ही चिन्हे

Leave a Reply

You cannot copy content of this page