अशोक काळेंच्या वाढदिवसी डॉक्टरांनी वाटल्या अर्सेनिक अल्बम गोळ्या
वृत्तवेध ऑनलाईन। 21 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 12 :35
By: Rajendra Salkar, 12 :35
कोपरगाव : कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. तुषार गलांडे यांच्या वतीने कोपरगाव शहरात नागरिकांना कोरोना प्रतिबंधक आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल व आमदार आशुतोष दादा काळे मित्र मंडळ चांदेकसारे यांच्या वतीने चांदेकसारे आरोग्य उपकेंद्र व साई स्वामी हॉस्पीटल,सोनाई हॉस्पीटल चांदेकसारे येथे पीपीई किट चे वाटप करण्यात आले.
कोरोना संकटाचा वाढता प्रादुर्भाव व दररोज वाढत असणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या त्यामुळे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे होणारे कोणत्याही प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणारे कार्यक्रम आयोजित केले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी व कार्यकर्त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी येवू नये असे आवाहन करण्यात आले होते.