कोपरगाव येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जयंती साजरी
वृत्तवेध ऑनलाईन। 21 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 18 :35
कोपरगाव : अखिल जीव जातीच्या उद्धारासाठी परब्रम्ह परमेश्वर श्री चक्रधर स्वामींनी गुजरातची राजधानी भोडोच येथे युवराज हरिपाळ देवाचे पतित उठवून शके ११४३ मध्ये अवतार स्वीकारला त्या अवताराला २० ऑगस्ट रोजी ८०० वर्षे पूर्ण झाली या अष्टशताब्दी वर्षनिमित्त कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समिती संचलित स्व. श्री नामदेवरावजी परजणे पाटील लॉ कॉलेज येथे गुरुवार दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली
यावेळी लौकी शिरसगाव येथील ईश्वर भक्ती श्री घुगे बाबा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली.यावेळी कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष हिरालाल महानुभाव, सावळी विहीर येथील सेवानिवृत्त कॅनॉल इन्स्पेक्टर दत्तुभाऊ कपाटे त्यांचे सहकारी रोहकले श्री चक्रधर स्वामी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्ण मठपती माध्यमिकच्या श्रीमती वंदना मराठे श्री चक्रधर स्वामी अध्यापक विद्यालय डी एड कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती थोरे म्याडम , श्री चक्रधर स्वामी आय टी आय कॉलेजचे प्राचार्य विजय खडांगळे सर उपप्राचार्य चेतन गाढवे कै सौ केशरबाई अर्जुनराव महानुभाव नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या अंजली ठुबे स्व श्री नामदेवरावजी परजणे पाटील लॉ कॉलेजचे प्राचार्य उबाळे सर सर्व विभागातील शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.या कार्यक्रमा प्रसंगी ईश्वर भक्त श्री घुगे बाबा यांचे पूजन करण्यात आले तर सेवानिवृत्त कॅनॉल इन्स्पेक्टर दत्तुभाऊ कपाटे त्यांचे सहकारी यांचा संस्थेच्या वतीने स्न्म्नान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे १२ व्या शतकातील एक तत्वज्ञ समाजसुधारक आणि महानुभाव पंथीयांचे संस्थापक होते महानुभाव धर्मिय लोकांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारा पैकी पाचवा अवतार मानले जाते दरवर्षी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मात्र जगभर कोरोना महामारीचे संकट असल्याने यंदाचा जयंतीउत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून तसेच यंदाचा जयंती उत्सव अष्टशताब्दी महोत्सव असल्याने प्रत्येकाने सायंकाळी आपापल्या घरी दिवे लावून हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला आहे
Post Views:
831