टॉप ट्वेंटी’ : स्वच्छ सर्वेक्षणात कोपरगाव नगरपरिषदेची  हनुमानउडी  

टॉप ट्वेंटी’ : स्वच्छ सर्वेक्षणात कोपरगाव नगरपरिषदेची  हनुमानउडी  

गतसालीच्या ३५२ व्या स्थानावरून  चालुवर्षी देशात पश्चिम विभागातील ५ राज्यात १८ वा क्रमांक तर राज्यात १७ वा क्रमांक

    वृत्तवेध ऑनलाईन। 22 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 18 :35

कोपरगाव : २०२० स्वच्छ सर्वे सर्वेक्षणात कोपरगाव नगर परिषदेनने गतसालीच्या ३५२ व्या स्थानावरून  चालुवर्षी देशात पश्चिम विभागातील ५ राज्यात १८ वा क्रमांक तर राज्यात १७ व्या स्थानावर हनुमानउडी  मारून टॉप ट्वेंटी’  मध्ये स्थान मिळवले आहे. अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे. 

प्रशांत सरोदे  म्हणाले, स्वच्छ भारत सर्वेक्षणात कोपरगाव नगरपालिकेने देशातील ‘टॉप ट्वेंटी’ शहरांमध्ये स्थान पटकावले आहे. या यादीत देशात पश्चिम विभागात १८ व्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरले.तर राज्यात १७ वे स्थानी व नाशिक विभागात १६ वे स्थानी आहे. केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत देशभरातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर केली. या सर्वेक्षणाच्या निकालात विविध विभागांमध्ये कोपरगावने एकूण   ३८७३.०३ इतक्या गुणांसह गुण पटकावले. गेल्या वर्षी कोपरगावचा क्रमांक ३५२ वा होता.अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली
अधिक माहिती देताना प्रशांत सरोदे म्हणाले सेवा स्तर प्रगती – ८२६.६२(१५००)
दस्तावेज प्रमाणिकरण – ५०० (१५००)
केंद्रीय पथक प्रत्यक्ष पाहणी -१३०३.५७ (१५००),नागरीकांचे अभिप्राय -१२४२.८४ (१५००), एकूण प्राप्त गुण – ३८७३.०३ (६०००) या स्पर्धेचा आज निकाल जाहीर झाला. या निकालाची घोषणा देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी, केंद्रीय शहर विकास मंत्री मा.हरदीप सिंग पुरी यांनी आज केली.
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या स्पर्धेच्या निकालामध्ये कोपरगांव शहराचा ३५२ वा क्रमांक होता. सन २०१९-२०२० या वर्षी कोपरगांव नगरपरिषदेने शहरात घनकच-याचे व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया करण्याचा उपक्रम राबविला. शहरातील निर्माण होणार-या ओल्या कच-या पासून कंपोस्टखत निर्मिती केली तर सुका कचरा विलगीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावली . शहरामध्ये असलेली  सार्वजनिक शौचालये , सार्वजनिक मुताऱ्या स्वच्छ ठेवल्या होत्या तसेच या स्पर्धेत  नागरीकांनी  मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता . नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन  तक्रारींचा निपटारा करण्यात देखील नगरपरिषदेने आघाडी घेतली होती. इतर कामात देखील कायम सातत्य ठेवल्याने कोपरगांव नगरपरिषदेचे नाव देशाच्या पटलावर  प्रमुख स्थानी आले आहे.  
या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा या पश्चिम विभागातील पाच राज्यातील पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या एकूण १३९ तर राज्यातील एकूण  ४८ नगरपरिषदांपैकी कोपरगाव नगरपरिषदेस एकूण ३८७३.०३ इतक्या गुणांसह देशात १८ वे, राज्यात १७ वे तर नाशिक विभागात १६ वे मानांकन प्राप्त झाले आहे. 
स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेकरिता केंद्रशासन, राज्यशासन व नाशिक  विभागाचे  अधिकारी, तांत्रिक तज्ञ यांच्याकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांनुसार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे नोडल अधिकारी,सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, यांनी अथक परिश्रम घेवून शहरातील नागरिक, तसेच विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, स्वच्छता दूत, यांच्या सहकार्याने  शहरातील स्वच्छतेमध्ये सातत्य ठेवल्यामुळेच हे मानंकन कोपरगांव शहरास प्राप्त झाले आहे.  
 कोपरगांव नगरपरिषदेस मिळालेल्या या मानांकनासाठी नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा २०२० साठी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, सर्व नगरसेवक नगरसेविका व नागरिक हे त्यांचे अभिनंदन करत आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page