नैसर्गिक आपत्ती व पिकावरील रोगात ; सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याची शेतकऱ्यांना मदत
व्हा.चेअरमन आप्पासाहेब दवंगे यांचा माहिती
वृत्तवेध ऑनलाइन , 25 Aug, 2020
By: Rajendra Salkar 14:00
कोपरगाव : सध्या शेतात उभी असलेली पीके सांभाळतांना शेतक-यांना मोठी कसरत करावी लागत आहे, नैसर्गिक आपत्ती नंतर आता विविध रोगांचा प्रादर्भाव पिकांवर होत असतांना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना मदतीला धावून आल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती संजीवनीचे व्हा.चेअरमन आप्पासाहेब दवंगे यांनी दिली.
सध्या सगळीकडे कोरोना आजाराचा संसर्ग असल्याने लाॅकडाउन झाले, त्यामुळे दैनंदिन व्यवहार बंद असल्याने जनजीवन विस्कळीत होउन आर्थीक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी बांधवांनाही या परिस्थितीचा मोठा आर्थीक फटका बसला. शेतीपीके आणि हाताशी आलेला शेतीमाल विक्रीअभावी खराब झाल्याने नुकसानीस सामोरे जावे लागले. आर्थीक विवंचना असतांनाही शेतीची मशागत करून पीके उभी केली. बदलत्या हवामानामुळे सदरच्या पीकांवर मोठया प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला. सध्या उस पिकांवर पांढरी माशी आणि लोकरी माव्यामुळे परिणाम झाला तर मका पिकांवरील लष्करी अळी, नाकतोडयाचा, काळया भुंग्याचा प्रादुर्भाव आणि कपाशी सारख्या पिकांचे तुडतुडयांनी मोठे नुकसान केले. तसेच सोयाबीन पीकांवरही किडीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या विवंचनेत आणखी भर पडली, असे असतांना मार्गदर्शन आणि मदतीची अपेक्षा असतांना कृषी विभागाकडून दुर्लक्ष केले गेले. परंतु नेहमीच शेतकरी बांधवाच्या हिताचा विचार करणारे माजी मंत्री आदरणीय शंकरराव कोल्हे आणि संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतक-यांमध्ये जनजागृती करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच किटकांच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी रासायनिक किटकनाशके, बुरशी नाशके तसेच वसंतदादा शुगर इन्टीटयुटचे जैविक किटक नाशके उपलब्ध करुन देवुन शेतक-यांना आपली पीके वाचविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले असल्याचे श्री दवंगे यांनी सांगितले.