कोपरगावात मंगळवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९. ९५ टक्के

कोपरगावात मंगळवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९. ९५ टक्के
तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २१. ०४ टक्के

वृत्तवेध ऑनलाईन | 25 Aug 2020, By : RajendraSalkar 16:10

कोपरगावात मंगळवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९. ९५ टक्के तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २१. ०४ टक्के कोरोनाने मृत्यू झालेले यांचे प्रमाण केवळ १.९७ टक्के इतकी आहे मंगळवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये १७६ रुग्णावर उपचार सुरु आहेत अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

कोपरगाव कोरोना अपडेट : ३३६९ स्वॅब तपासणी यात ७०३ नगर, रॅपिड टेस्ट, २६६६ निगेटिव्ह तर ७०९ पॉझिटिव्ह, ४९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने १४ जणांचा मृत्यू, १७६ रुग्णावर उपचार सुरू

कोपरगाव : मंगळवारी सकाळी ९१ जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात २४ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर ६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २७ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. सोमवारी दिवसभरात २४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असे डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.

२४ पॉझिटिव्ह रुग्णात : महादेव नगर १,संजय नगर २, मुर्शतपुर २, सुभद्रानगर १,येवला रोड १, टाकळी १,बागुल टावर १, इंदिरा पथ १, समतानगर ४, ब्रिजलाल नगर १, धरणगाव रोड २, कोकमठाण २, श्रद्धानगरी २, संवत्सर १, बाजारतळ १, सुभाषनगर १, यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page