सर्वात मोठी बातमी! कोपरगाव शहर पुन्हा चार दिवस शटरडाऊन
२८ ते ३१ ऑगस्ट या ४ दिवस सर्व अत्यावश्यक सेवासह सर्व आस्थापना १००% लॉकडाऊन
वृत्तवेध ऑनलाईन | 26 Aug 2020, By : RajendraSalkar 17 : 35
कोपरगाव : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करून संपर्क साखळी तोडण्यासाठी कोपरगाव शहरात शुक्रवारपासून पुन्हा चार दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात
कोपरगाव : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करून संपर्क साखळी तोडण्यासाठी कोपरगाव शहरात शुक्रवारपासून पुन्हा चार दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गुरूवारी (२७ ऑगस्ट) रोजी दिवसभर शहर खुले राहणार असून नागरिकांनी आपल्याला आवश्यक असणारा भाजीपाला किराणामाल व इतर सामान खरेदी करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी प्रशासनाच्यावतीने केले आहे. शहर शुक्रवार (२८ ऑगस्ट) शनिवार, रविवार सोमवार (३१ऑगस्ट )रोजी असे चार दिवस शटरडाऊन राहणार आहे. मात्र या काळात वैद्यकीय सेवा, औषध दुकाने आणि दूध, बँक व पतसंस्था(
या अत्यावश्यक सेवा सकाळी ५ ते ८ या वेळेत दवाखाने व मेडिकल सुरू राहतील अत्यावश्यक काम असेल तरच बँकेत जावे असेही त्यांनी सांगितले आहे .
शहरात गेल्या तीन दिवसात जवळपास १०० च्यावर रुग्णांची भर पडली आहे. कोपरगाव शहरातील ज्या भागांमध्ये रुग्णांची संख्या आढळून आली आहे. त्या भागामध्ये शटर डाऊन कालावधीत गांधीनगर, महादेवनगर, गोरोबानगर, दत्तनगर, टिळकनगर, विवेकानंद नगर, सप्तर्षीमळा (कालेमळा) सुभाषनगर, संजयनगर, समतानगर व निवारा सुभद्रानगर इ. अशा विविध भागात हे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची कोरोना सदृश्य लक्षणांची सर्वेक्षण करणेसाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. घराघरात जाऊन नमुने तपासणी करण्यात येणार आहे. ज्या घरात तीन पेक्षा जास्त व्यक्ती कोरोना बाधित आढळतील त्यांना क्वारंटाइन करण्यात येईल.
कोरोना संसर्गाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकाग्रहास्तव व लोकांच्या आलेल्या सूचनेवरून प्रशासनाने पुन्हा चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्याची सुरुवात शुक्रवारी होणार आहे . शहराच्या सर्व भागातील छोटे-मोठे व्यवसाय हे पूर्ण बंद राहतील. रस्त्यांवर नागरिकांची ये-जा आता बंद करण्यात आलेली आहे . मुख्य चौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अधिकारी शहरभर गस्त घालणार आहेत .
कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि, कोपरगाव शहरात कोविड-१९ कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहून काळजी घ्यावी.
आपल्या कुटुंबाकडे सर्वेक्षण करिता येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य करून अचूक माहिती देवून सहकार्य करावे. खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे इ. लक्षणे दिसल्यास उपचार घ्या.
एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास, त्यांना तपासणी करण्यास प्रोत्साहित करा.कुटुंबातील लहान मुले व जेष्ठांची काळजी घ्या.
कोविड-१९ ची लक्षणे दिसत असलेल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र यांची माहिती त्वरित प्रशासनाला कळवा.
काळजी करू नका.. सावध रहा.. स्वतः ला इतरांना सुरक्षित ठेवा..
मास्क व सॅनिटायझर चा नियमित वापर करा.
घरी राहा…. सुरक्षित राहा….
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. असे आवाहन स्थानिक प्रशासन अधिकारी तहसीलदार योगेश चंद्रे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, शहर पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी केले आहे.