कोपरगावात बुधवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४१ टक्के

कोपरगावात बुधवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४१ टक्के

वृत्तवेध ऑनलाईन | 26 Aug 2020, By : RajendraSalkar 16:10

कोपरगाव : कोपरगावात बधवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२. ४१ टक्के तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ १८. ५८ टक्के कोरोनाने मृत्यू झालेले यांचे प्रमाण केवळ १.९० टक्के इतकी आहे बुधवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये १८९ रुग्णावर उपचार सुरु आहेत अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

कोपरगाव कोरोना अपडेट : आज पर्यंत एकूण बाधित ७३६ आज पर्यंत बरे झालेले रुग्ण ५३३,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४१%,सद्यस्थितीत ॲक्टिव रुग्णसंख्या १८९एकूण मृत्यू १४ मृत्यूचे प्रमाण १.९०%

बुधवारी सकाळी ९४ जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात २२ नवे तर २ नगर व ३ खाजगी लॅब अहवालानुसार असे २७ ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर ८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १४ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. बुधवारी दिवसभरात २७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असे डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.

२७ पॉझिटिव्ह रुग्णात : कोळपेवाडी१, गांधीनगर १, धारणगाव ३, संभाजी चौक १, पंचायत समिती समोर १, (खाजगी लॅब अहवाल ३ बाधीत), सुभद्रानगर २, शहाजापूर १, गिरमे चाळ १, टाकळी १, येवला रोड १, शिवाजी रोड २, यशवंत सोसायटी इंदिरा पथ १, संजय नगर १,चासनळी १, लौकी१, समतानगर २, धामोरी १,नगर २ बाधीत (निवारा १, व ब्राम्हणगाव १) यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page