कोरोना नष्ट होऊ दे, एकता आणि अखंडता आबाधित राहु दे ! गणरायाला रेणुका कोल्हेंचे साकडे

कोरोना नष्ट होऊ दे, एकता आणि अखंडता आबाधित राहु दे ! गणरायाला रेणुका कोल्हेंचे साकडे

मसिरा मनियार, रेहान मेहतार यांचे कौतुक

वृत्तवेध ऑनलाईन | 26 Aug 2020, By : RajendraSalkar 18:10

कोपरगाव : गणराया तुमच्या आगमनानंतर जगावरंच कोरोनाचं संकट नष्ट होऊ दे, तुझ्या चमत्काराची प्रचिती येऊ दे, एकता आणि अखंडता आबाधित राहु दे ! गणरायाला रेणुका विवेक कोल्हे यांचे साकडे

कोरोना महामारीमुळे सध्या भयंकर परिस्थिती उदभवलेली आहे, परंतु तरीही आपली धार्मिक परंपरा जपण्यासाठी रसायनिक रंग प्लॅस्टर आॕफ पॅरिस मुर्तीमुळे होणारे जलप्रदुषण टाळण्यासाठी पर्यावरण पुरक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापणा केली पाहिजे त्याच बरोबर अशा धार्मिक उत्सवाप्रसंगी जाती पातीचे भिंती नष्ट करुन एक विचाराने सण साजरी करावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला याच बरोबर गणेशोत्सव घरीच साजरा करण्याचे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सौ रेणुका कोल्हे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शाडू गणेशमुर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दिले,
व त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
स्कुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जातेे.

एल.के.जी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी व्हीडीओ पाहुन घरच्या घरी शाडू मातीच्या मुर्ती बनविल्या. मसिरा मनियार, रेहान मेहतार, वेदश्री दरेकर, कृष्णा म्हस्के, या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या श्री.गणेश मुर्तीची शाळेत स्थापना करण्यात आली. स्वतःच बनविलेल्या मुर्तींची प्रतिष्ठापणा केल्याचा वेगळाच आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे.

शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माजी मंञी शंकरराव कोल्हे , सदस्य बिपीनदादा कोल्हे, सदस्य माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी उत्कृष्ट मुर्ती साकारल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदरचा उपक्रम यशस्वी करण्यात अकॕडमीक हेड हरीभाऊ नळे , प्राचार्य बाळासाहेब जाधव यांच्यासह सर्व शिक्षकांनी व कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले.

Leave a Reply

You cannot copy content of this page