आत्मनिर्भर भारत दिशेने संजीवनी विद्यार्थ्यांचे एक पाऊल

आत्मनिर्भर भारत दिशेने संजीवनी विद्यार्थ्यांचे एक पाऊल

शेअरकर हे  नवीन ॲप

वृत्तवेध ऑनलाईन | 26 Aug 2020, By : RajendraSalkar 16:10

कोपरगांव: चिनी बनावटीच्या शेअर इट आणि झेंडर  ॲप ला तोड म्हणून संजीवनी पॉलिटेक्निकच्या सर्वेश सुभाष होन आणि जयेश संजय देशमुख या जोडगोळीने शेअरकर हे  नवीन ॲप विकसीत करून आत्मनिर्भर भारतच्या दिशेने एक पाऊल टाकले असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करण्यात आले आहे.

अलिकडे भारत चीन संबंध बिघडल्याने भारताने चिनी बनावटीच्या ५९ ॲपवर बंदी आणली  त्यात शेअर इट आणि झेंडर झेंडर ॲप्सचा समावेश होता. त्यामुळे फोटो, फाईल, व्हीडिओ, गाणे शेअर करण्यासाठी कोणते  कोणते ॲप  वापरायचे असा प्रश्न होता. तो प्रश्न संजीवनी पाॅलीटेक्निकच्या सर्वेश होन आणि जयेश देशमुख या विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दी चातुर्याच्या जोरावर शेअरकर हे नवीन नवीन ॲप  विकसीत करून सोडविला आहे .

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग श्री अमित कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून संजीवनी मध्ये मिळालेल्या ज्ञानाचा वापर करीत नाविण्याचा शोध घेतल्याबध्दल कौतुक केले. सर्वेश व जयेशच्या यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी त्यांचे व त्यांचे आई वडील सुभाष हरीभाऊ होन, सारीका सुभाष होन, संजय संभाजीराव देशमुख व सरला संजय देशमुख यांचा कोविड १९ चे मार्गदर्शक तत्वे पाळून सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर व विभाग प्रमुख प्रा. जी. एन. जोर्वेकर, प्रा. एम. व्ही. खासणे उपस्थित होते.

सत्कार प्रसंगी सर्वेश व जयेश यांनी सांगीतले की अॅप कसे विकसीत करावे याचे प्रशिक्षण आम्हाला संजीवनीतुन मिळाले. सरकारने चिनी बनावटीच्या बनावटीच्या नवीन ॲप वर  बंदी घातल्यावर संधी म्हणुन आम्ही नवीन ॲप्स विकसीत करण्याच्या मागे लागलो आणि यशस्वीही झालो. त्यांनी सांगीतले की हे अॅप पुर्णतः भारतीय असुन वापरण्यास अत्यंत सोपे व सुरक्षित आहे. एक जीबी पर्यंत असलेल्या एक्सल, पिक्चर, व्हीडिओ व कोणतीही फाईल फक्त एका मिनिटात शेअर होतात. झेंडर व शेअरइट पेक्षाही जलद गतीने फाईल शेअर होते.
संजीवनच्या पत्रकात पुढे म्हटले आहे की कोरोना विषाणुचा प्रादर्भाव रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन करण्यात आला होता. या लाॅकडाऊन काळात अनेकांनी सदउपयोग करीत आत्मसात केलेल्या ज्ञानाच्या जोरावर व आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांच्या आधारे नाविण्याचा शोध घेतला. यात संजीनीच्या सर्वेश व जयेश यांनी शेअरकर’ हे अप विकसीत करून संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला. हे अप प्लेस्टोअरवर उपलब्ध असुन शेकडो मोबाईल धारकांनी ते इन्स्टाॅल केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page