दिलासादायक कोपरगावात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ .०६ टक्के
लॉक डाऊन करण्याची खरंच गरज आहे का ? सवाल जनतेचा
वृत्तवेध ऑनलाईन | 27 Aug 2020, By : RajendraSalkar 15:10
कोपरगाव : कोपरगावात गुरूवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.०६ टक्के हे दिलासादायक चित्र आहे. तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २१. ३३ टक्के कोरोनाने मृत्यू झालेले यांचे प्रमाण केवळ १.८३ टक्के इतकी आहे. गुरूवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये १७६ रुग्णावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
कोपरगाव कोरोना अपडेट : आज पर्यंत एकूण बाधित ७६२ आज पर्यंत बरे झालेले रुग्ण ५७२,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.०६ %,सद्यस्थितीत ॲक्टिव रुग्णसंख्या १७६ एकूण मृत्यू १४ मृत्यूचे प्रमाण १.८३%
गुरूवारी सकाळी ९८ जणांच्या नमुन्याची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. यात २६ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर ७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३९ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. अकरा जणांचे नमुने तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहे. गुरूवारी दिवसभरात २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असे डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.
२६ पॉझिटिव्ह रुग्णात : सुभद्रानगर ४, गांधिनगर २, शुभम नगर १, निवारा १, कुंभारी १, बागुल टावर २, लौकी १, समतानगर ३ धामोरी १,ब्राह्मण गल्ली १, शिंगणापूर १, पोलीस लाईन १,पोहेगाव १,टिळक नगर १,हनुमान नगर १, इंदिरा पथ१, गोरोबा नगर १,धारणगाव रोड १, शंकर नगर १, यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.
गेले आठवडाभर याचा विचार करता रुग्णांची सापडणारी संख्या पाहता जे आकडे समोर येत आहेत गुरुवारी १९ वेगवेगळ्या ठिकाणी २६ रुग्ण सापडले तर दोन दिवसांमध्ये ४० आणि ५० रुग्णसंख्या झाली होती. यात एकाच घरातील दहा दहा लोकांचा समावेश होता. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण रुग्णांची संख्या याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर लॉक डाऊन करण्याची खरंच गरज आहे का ? असा प्रश्न समोर येत आहे. गेल्या सहा महिन्यापासून लहान मोठे व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे इकडून तिकडून व्यवसायाची स्थिरस्थावर होत असताना व सणावारांचे दिवस आले असताना थोडीबहुत कमाई होईल अशी आशा छोट्या-मोठ्या दुकानदारांना होती. परंतु काहींच्या अट्टाहासामुळे व लोकाग्रहास्तव या गोंडस नावाखाली प्रशासनाला शहर चार दिवसाचा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला म्हणण्यापेक्षा घ्यावयास भाग पाडले असे म्हणणे जास्त सोयीचे होईल. यातून पुन्हागोरगरीब छोट्या-मोठ्या दुकानदारांचे कंबरडे मोडणार आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्नाचा सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.





