गायत्री कंपनीच्या निकृष्ट कामाबद्दल आमदार काळे यांनी प्रकल्प अधिकाऱ्याला झापले
वृत्तवेध ऑनलाईन | 28 Aug 2020, By : Rajendra Salkar 12:50
कोपरगाव : तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीस दिलेले आहे. सध्या भूमिगत विज वाहिन्यांचे रोड क्रॉसिंगचे काम सुरू आहे. कुठल्याही प्रकारचे पाइपमधून वीज वाहिन्या केबल न टाकता थेट केबल टाकल्याचा प्रकार उघडकीस आला असून या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल करत आमदार आशुतोष काळे यांनी काम थांबवले. गायत्री कंपनीच्या प्रकल्पाला अधिकाऱ्याला सज्जड दम भरला. तर अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. भूमिगत वीजवाहिन्या जमिनीखाली पसरवून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेक थांबवा. योग्य प्रकारे काम झाले पाहिजे. ज्या ठिकाणी रोड क्रॉसिंग आहे त्याठिकाणी जाड आवरणाचे पाईप टाकून त्यातून विद्युत वाहिन्या केबल टाका आणि त्यानंतरच खड्डे बुजवा असे अशी कडक भूमिका आमदार काळे यांनी घेतली.आमदार काळे यांच्या दणक्यानंतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.
समृद्धी महामार्गामध्ये ज्या ठिकाणी वीजवाहिन्या समृद्धी महामार्ग ओलांडून जात आहे त्या ठिकाणी भूमिगत टाकण्यात येणाऱ्या वीजवाहिन्यांना टणक पाईपाचे वेष्टन असणे व वीजवाहिन्या आराखड्यानुसार जमिनीखाली योग्य अंतरावर असणे बंधनकारक आहे जेणेकरून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात यदाकदाचित या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला तर त्या वीज वाहिन्या दुरुस्त करता येणे शक्य होईल. मात्र सबंधित ठेकेदाराने कोणत्या प्रकारचे वेष्ठण पाईप वापरले याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदार आशुतोष काळेंना सदर वीजवाहिन्या वीणा वेष्ठणच टाकल्याचे निदर्शनास येताच सबंधित ठेकेदार, समृद्धी महामार्गाचे अधिकारी, महावितरण व महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांची आमदार आशुतोष काळे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.
यापूर्वी समृद्धी महामार्गाबाबत झालेल्या विविध बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे व दिलेल्या सूचनांप्रमाणे आजतागायत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ, समृद्धी महामार्गाचे अधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुक्यासाठी असणाऱ्या नियंत्रण कार्यालयात गुरुवार (दि.२७) रोजी बैठक घेतली. या बैठकी दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामामुळे बुजलेल्या चाऱ्या, विविध ठिकाणी प्रस्तावित व आवश्यक असलेल्या ठिकाणी करावयाचे असलेले युटीलिटी डक्ट (वापर बोगदा), कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेली कंपनी वापरत असलेले ग्रामीण मार्ग (व्ही.आर) तसेच इतर जिल्हा मार्ग (ओ.डी.आर.) यांची दुरुस्ती, समृद्धी महामार्गामुळे वीज वाहिन्यांचे निर्माण झालेले प्रश्न, समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या सहठेकेदारांनी मशिनरी मालकांचे व कामगारांचे थकविलेले पेमेंट, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून समृद्धी महामार्गासाठी गौण खनिज घेतले आहे त्या गौण खनिजाची उत्खनन व वाहतूक करतांना खराब झालेले रस्ते व निर्माण शेतकऱ्यांच्या अडचणी, तसेच समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या स्थानिक कामगारांच्या अडचणी याबाबत चर्चा करून आमदार आशुतोष काळे यांनी आढावा घेतला.
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी गायत्री कंपनीच्या समृद्धी महामार्गातील कामाच्या निकृष्ट दर्जाची तक्रारी केल्या त्याची शहानिशा करताना आमदार काळे यांना गायत्री कंपनी करीत असलेल्या निकृष्ट काम दिसून आले.निकृष्ट काम होत असेल तर ते खपवून घेणार नाही. प्रकल्प अधिकाऱ्यांकडून लोकांच्या अडचणी सोडविण्यात हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अडचणी गायत्री कंन्स्ट्रक्शनचे सध्या कार्यरत असलेले अधिकारी जर सोडवू शकत नसतील तर या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा व अडचणी मार्गी लावा वेगळ्या मार्गाचा अवलंब करण्याची वेळ येवू देवू नका असा सज्जड दम आमदार काळे यांनी ठेकेदार गायत्री कंपनीचे
ताताराव डुंगा व त्यांच्या सहकाऱ्यांना दिला.
सुधाकर रोहोम, धोंडीराम वक्ते, चारुदत्त सीनगर, दिलीप शिंदे, सचिन आव्हाड, रोहिदास होन, सोपानराव आभाळे, विठ्ठलराव जावळे, केशवराव जावळे, सुधाकर होन, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, ज्ञानेश्वर गव्हाणे, देर्डे योगीराज देशमुख, नंदकिशोर औताडे, देवेन रोहमारे, विलास चव्हाण, कृष्णा शिलेदार, संतोष पवार, नरहरी रोहमारे, रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एस.के.बावा, टीमलीडर प्रशांत ताडवे, वीज वितरण कंपनीचे सूर्यवंशी, निरगुडे, बोन्डकर, गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा, आदी उपस्थित होते.
आपली प्रतिक्रिया द्या