दिलासादायक कोपरगावात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ .५६ टक्के
घाबरू नका सुरक्षित रहा !
वृत्तवेध ऑनलाईन | 28 Aug 2020, By : RajendraSalkar 15:10
कोपरगाव : कोपरगावात शुक्रवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ . ५६ टक्के हे दिलासादायक आहे. तर कोरोना ग्रस्तांचे प्रमाण केवळ २१. ४७ टक्के कोरोनाने मृत्यू झालेले यांचे प्रमाण केवळ १.८७ टक्के इतकी आहे. गुरूवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये १८१ रुग्णावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
कोपरगाव कोरोना अपडेट : आज पर्यंत एकूण बाधित ८०२ आज पर्यंत बरे झालेले रुग्ण ६०६ ,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.५६ %,सद्यस्थितीत ॲक्टिव रुग्णसंख्या १८१ एकूण मृत्यू १५ मृत्यूचे प्रमाण १.८७%
शुक्रवारी सकाळी १६२ जणांच्या नमुन्याची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. यात ३४ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर १२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३५ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. अकरा जणांचे नमुने तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले होते त्यापैकी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व
सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर खाजगी दवाखान्यात तपासणी करण्यात आलेल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असे डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.
४० पॉझिटिव्ह रुग्णात : गांधीनगर २, साई सिटी १, खडकी २, लौकी २, धावा रणगाव रोड २, गजानन नगर-२ सोनेवाडी १, टिळकनगर १२, महादेव नगर १, मुर्शतपुर १, सराफ बाजार १, काळे मळा ७, सप्तर्षी मळा १, गिरमे चाळ १, पंचायत समिती समोर १, संजीवनी २, अण्णाभाऊ साठे पुतळा १, यांचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. फुलसौंदर यांनी दिली.
ठळक बाबी… आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात ३ हजार ७३४ व्यक्तींची झाली कोरोना टेस्ट यात ८०२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर २ हजार ९३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, आतापर्यंत १५ जणांचे कोरोनाने बळी घेतले.तर ६०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली.





