पतसंस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू– ना. जयंत पाटील
पतसंस्था फेडरेशनचे अनेक प्रश्नावर सकारात्मक चर्चा काका कोयटे यांची माहिती
वृत्तवेध ऑनलाईन | 28 Aug 2020, By : RajendraSalkar 19:10
कोपरगाव : प्रभारी सहकार मंत्री नामदार जयंत पाटील यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील आणि सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे प्रभारी सहकार मंत्री मा.जयंत पाटील यांचे दालनात आज शुक्रवारी (२८ ऑगस्ट) रोजी समवेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी यांची बैठक दु . ३.०० ते ४.३० या दरम्यान मंत्रालयात संपन्न झाली.
या बैठकीत अनेक प्रश्नावर गांभीर्याने चर्चा झाली प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू असे आश्वासन ना. जयंत पाटील यांनी दिले.
या बैठकीस महराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे , संस्थापक वसंतराव शिंदे , महासचिव शांतीलाल शिंगी , यांचे सह संचालक शिवकृपा पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत वंजारी व महाराष्ट्र महिला सबलीकरण समितीच्या अध्यक्षा सौ.अंजलीताई पाटील , महाराष्ट्र कुस्तीग्रीर उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे , राज्य फेडरेशनच्या सरव्यवस्थापिका सौ.सुरेखा लवांडे तसेच सहकार खातेमधील मंत्रालय अधिकारी संतोष पाटील , शिंगटे साहेब तसेच अप्पर निबंधक श्री.पी.एल.खंडगळे , राम कुलकर्णी , जितेंद्र देशपांडे हे हजर होते .
या बैठकीत पुढील विषयांना प्रभारी सहकार मंत्री जयंत पाटील यांनी अनुकूलता दाखविली . १ ) महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थांचे वेब पोर्टल तयार करणे २ ) महाराष्ट्र राज्य पतसंस्थांचे १०१ वसुली दाखले जास्तीत – जास्त १ महिना कालावधीत ऑनलाईन पध्दतीत देणार ३ ) सहकारी पतसंस्थांचे थकीत थकबाकीदार यांच्या कर्जापोटी जप्त केलेल्या मालमत्ता विक्री करणेसाठी रेडीरेकनर / मार्केट व्हॅल्यु यामध्ये जे दर जास्तीत – जास्त असेल त्यास सहकार खाते तातडीने मान्यता देणार . थकबाकीदार यांना मालमत्तेला जास्त किंमत येण्याची अपेक्षा असल्यास त्या किंमतीत विक्री करणेसाठी थकबाकीदार यांना १ महिना मुदत देणार ४ ) महाराष्ट्रातील पतसंस्थांच्या कर्जदार यांचे क्रेडीट रेटींग महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ने तयार केलेल्या क्रास प्रणाली मार्फत तपासणीची सक्ती करणार अशा अनेक प्रश्नावर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.