कोनपा इमारतीसाठी २ कोटी मंजूर – आ . आशुतोष काळे
वृत्तवेध ऑनलाईन | 1 Sep 2020,
By : RajendraSalkar 17:10
कोपरगाव : अर्थ खाते व नगरविकास खात्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव नगरपालिका इमारतीसाठी २ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरु असून या इमारतीचे अपूर्ण असलेले काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार व नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. इमारतीसाठी टप्पा क्रमांक दोनच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. पालिका प्रशासनाने या कामावर लक्ष केंद्रित करून तातडीने इमारत पूर्ण करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.
कोरोना संकटात पालिका इमारतीसाठी २ कोटी रुपये निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहेत