मंजूर बंधाऱ्याचे माती परीक्षण सुरु – आ. आशुतोष काळे

मंजूर बंधाऱ्याचे माती परीक्षण सुरु – आ. आशुतोष काळे

Approved dam soil test

वृत्तवेध ऑनलाईन । 2 Sep 2020
By: Rajendra Salkar 16.20

कोपरगाव : तालुक्यातील मंजूर येथील मंजूर, चास, हंडेवाडी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर या गावांच्या शेतीसाठी वरदान ठरणा-या मंजूर बंधाऱ्याचे डिझाईनसाठी माती परीक्षणाचे काम सुरु झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मंजूर बंधारा आराखड्यासाठी माती परीक्षणाचे काम सुरू

२०१९ च्या महापुरामध्ये मंजूर बंधारा दुसऱ्यांदा वाहून जाऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकासह शेतजमिनी, विहिरीसह वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या मंजूर, चास, हंडेवाडी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावातील शेतीचे अस्तित्व धोक्यात आले होते. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे पाठपुरावा केला.

जलसंपदा अधिकाऱ्यांनी सहा महिन्यात दोन ते तीन वेळा मंजूर बंधाऱ्याची पाहणी केली . चालू वर्षीच्या पावसाळ्यात या बंधाऱ्यात पाणी अडविण्याच्या त्यादृष्टीने प्राथमिक स्वरूपातील काम मे महिन्यांत हाती घेतले. मात्र जूनला पावसामुळे गोदावरी नदीला नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे हे काम पूर्ण होवू शकले नाही.
मंजूर बंधाऱ्याचे शाश्वत व टिकावू कामासाठी जलसंपदा विभागाला सी.डी.ओ. (मध्यवर्ती संकल्पचित्र संस्था) नाशिक संस्थेला आराखडा तयार करण्याचे उच्चस्तरीय आदेश प्राप्त झाल्याने मंजूर बंधाऱ्याच्या परिसरातील भूगर्भातील प्राथमिक माती परिक्षणाबरोबरच भूगर्भात खडक किती खोलीवर आहे, त्यानुसार डिझाईन (प्रारूप आराखडा) तयार करण्यात येणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page