अधिवेशनात मांडता येणार नसले तरी मंत्र्यांना भेटून प्रश्न मार्गी लावणारच – आ. आशुतोष काळे
वृत्तवेध ऑनलाइन। 5 Sep 2020
By: Rajendra Salkar, 15.30
कोपरगाव : कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचे असल्याने अधिवेशनात प्रश्न मांडता येणार नाहीत तरीही मंत्र्यांना भेटून विकासाचे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिली.
विधानसभेनंतर मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगली संधी मिळाल्यामुळे अनेक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधता आले त्यामुळे मतदार संघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी चांगला उपयोग झाला मात्र यावेळी कोरोना मुळे सोमवार मंगळवार दोन दिवसाचे पावसाळी अधिवेशन असल्याने आपल्याला आपले विकासाचे प्रश्न मांडण्याची जास्त संधी मिळणार नाही हे जरी खरे असले तरी जे प्रश्न सभागृहात उपस्थित करावयाचे होते ते प्रश्न त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून सोडविता येवू शकतात. त्यामुळे प्रश्न सोडविण्यासाठी अडचण नाही. असे मत आ. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केले
पावसाळी अधिवेशन दि. ७ व ८ संप्टेंबर रोजी होणार आहे.
कोपरगाव मतदार संघात महत्वाचे प्रश्न पाच नंबर साठवण तलावासाठी निधी, योजनांचे बजेट वाढल्यामुळे या योजनांना सुधारित प्रशाकीय मान्यता, नवीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना मंजुरी व निधी तरतूद ,. ब्राम्हणगाव प्रस्तावित असलेल्या वीजउपकेंद्रासाठी निधी व चांदेकसारे नवीन उपकेंद्र मंजुरी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला पाहिजे त्यासाठी कार्गो सेवा सुरु करावी. हवामान आधारित पिक विमा निकषांमध्ये बदल, करावा. हवामानयंत्रांची संख्या वाढवावी, वारी येथील पुलाची भक्कमपणे दुरुस्ती, करून गोदावरी नदी ओलांडून जाणाऱ्या उत्तर-दक्षिण रस्त्यावरील वेळापूर-मायगाव देवी, सुरेगाव-सांगवी भुसार, डाऊच बु.- चांदगव्हान या ठिकाणी गोदावरी नदीवर पूल, गरजू रुग्णांसाठी कोपरगाव येथे १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी द्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रांना अद्यावत रुग्णवाहिका आदी प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडता येणार नाहीत. आजपर्यंत अधिवेशनात विकासाचे प्रश्न मांडण्याबरोबरच महाविकास सरकारच्या प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांना भेटून विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जरी अधिवेशनात प्रश्न मांडण्यासाठी परवानगी नसली तरी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून हे प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.