पोहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; केंद्राला तीन दिवस टाळा
तूर्तास आपत्कालिन सेवा गावठाण आंगणवाडीत
वृत्तवेध ऑनलाइन। 5 Sep 2020
By: Rajendra Salkar, 15.30
पोहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून हे प्राथमिक आरोग्य केंद्र तीन दिवस सोमवार पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विधाटे यांनी दिली
माहितीनुसार सदरील कर्मचारी हा पोहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कामावर रुजू झाला होती. मात्र याठिकाणी आल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागल्याने या कर्मचाऱ्याचा स्वॅब तपासणी करिता पाठविण्यात आला. तोपर्यंत त्याचेवर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले होते.
तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यास पुन्हा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र दिवसासाठी सोमवार पर्यंत शंभर टक्के बंद ठेवण्यात आले आहे.
रुग्णांना बाह्यरूग्ण आणि आपत्कालिन सेवा गावठाण येथिल आंगणवाडीमध्ये देण्यात येणार आहे. असे डॉ. विधाटे यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
यावेळी तहसिलदार योगेश चंद्रे, शिर्डी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले , गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाटे आदींनी परिसरात फिरून नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे व गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.