विद्यार्थ्यांनो क्षमता व गुणवत्ता वाढीसाठी पौष्टिक खा, फिट राहा – रेणुका कोल्हे
निमित्त: राष्ट्रीय आहार सप्ताह
National Diet Week
वृत्तवेध ऑनलाइन। 6 Sep 2020
By: Rajendra Salkar, 10.05
कोपरगाव : विदयार्थी हे देशाचे भविष्य असुन विद्यार्थ्यांनो क्षमता व गुणवत्ता वाढीसाठी पौष्टिक खा, फिट राहा,असे आवाहन संजीवनी इंग्लिश मिडीयमच्या सदस्या सौ. रेणुका विवेक कोल्हे यांनी राष्ट्रीय आहार सप्ताह निमित्त आयोजित वेबिनारचे गुगलमीट प्रणालीव्दारे केले.
रेणुका कोल्हे म्हणाल्या, सुदृढ शरीर संपदा आणि प्रसन्न मनाने माणुस कोणत्याही संकटावर मात करू शकतो, आणि निरोगी आयुष्यासाठी पौष्टिक आहार आपल्याला निरोगी शरीर देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते पौष्टिक पदार्थांमध्ये उच्च दर्जाचे प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाणी यांचा समावेश आहे. त्याकरीता सर्वांनी पौष्टिक आहाराला प्राधान्य दिलेे पाहिजे. असे त्यांनी स्पष्ट केले .
१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर राष्ट्रीय आहार सप्ताह निमित्त दोन दिवसीय वेबिनारचे गुगलमीट प्रणालीव्दारे विद्यार्थ्यांना
डॉ. राजेश माळी यांनी “आहारावरील नियंत्रण” तसेच डॉ.मयूर जोर्वेकर यांनी ” नियंत्रित आणि संतुलित आहार ” या अंतर्गत आजच्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर आहार आणि बुध्दीमता वाढीसाठी बालवयात दयावयाचा पौष्टिक आहार कशा पध्दतीने असावा यावर विशेष मार्गदर्शन केले.
चुकीचा आहार टाळून विद्यार्थ्यांच्या बौध्दीक वाढीसाठीच्या आहाराच्या सवयी आत्मसात कराव्यात. तसेच आरोग्य वर्धक आहारामुळे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते, त्यामुळे बौध्दीक क्षमतेत वाढ होत असल्याचे मार्गदर्शन डाॅ. माळी व डाॅ. जोवेंकर यांनी केले.
राष्ट्रीय आहार सप्ताह निमित्त दि. २ सप्टेंबर रोजी इ. ०७ ते ८ वी तसेच दि. ०३ सप्टेंबर रोजी इ. ०९ व १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी हे वेबिनारचे सञ आयोजित केले असल्याचे प्राचार्य जाधव यांनी सांगितले. अॅकेडमीक हेड प्रा. हरिभाऊ नळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिक्षम घेतले.