त्या रस्त्यासाठी तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ९९ लाखाचा निधी दिला – सौ सिताबाई आदमाने

त्या रस्त्यासाठी तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ९९ लाखाचा निधी दिला – सौ सिताबाई आदमाने

धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्तीकडे

वृत्तवेध ऑनलाईन। 9 Sep 2020
By : Rajendra salkar, 12.30

कोपरगाव – राहाता तालुक्यातील धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्तीकडे जाणा-या रस्त्याच्या कामासाठी माजी आमदार सौ स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी ९८ लाख ९० निधी दिल्यामुळेच सदर रस्त्याचे काम पुर्णत्वाकडे जात असल्याचा दावा धनगरवाडीचे सरपंच सौ. सिताबाई रामभाउ आदमाने यांनी केला .

कोपरगाव विधानसभा मतदार संघात येत असलेल्या राहाता तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठया प्रमाणात निधी देउन माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी या भागाला ख-या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे. अनेक वर्षापासुन दुर्लक्षित राहिलेल्या या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून सौ कोल्हे यांचेकडे मागणी केली असता त्यांनी तातडीने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१८-१९ भाग-१ अंतर्गत या रस्त्याच्या कामाचा समावेश करून निधी मिळवून दिला. धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्ती या सुमारे २ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी रूपये ९८ लाख ९० हजाराचा निधी दिल्यामुळे या रस्त्याचे काम सुरू झाले. निधी उपलब्ध करुन दिल्याने ग्रामसंस्थांनी सौ. कोल्हे यांचे आभार मानले.

या भागातील शेतकरी, दुध उत्पादक, विदयार्थी आणि नागरीक यांची या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कुचंबणा होत होती, दैनंदिन वर्दळीसाठी असलेला हा रस्त्याचे काम व्हावे म्हणून नागरीकांची मागणी होती, मतदार संघासाठी कोटयावधीचा निधी उपलब्ध करून देतांना धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्ती या रस्त्याच्या कामाकडेही प्राधान्याने लक्ष दिले. त्यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या या रस्त्याचे काम सुरू असून थोडयाच दिवसात पुर्णत्वाकडे जात असल्याने ग्रामस्थांची अडचण दूर होणार असल्याचे सरपंच सौ सिताबाई रामभाउ आदमाने यांनी सांगितले. त्यावेळी माजी सरपंच माजी राजेंद्र रक्टे, रंगनाथ राशिनकर उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page