तोंडाला मास्क न लावल्याने व जमावबंदीचा आदेश मोडणार्या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
Violation of the Collector’s order without wearing a face mask
वृत्तवेध ऑनलाईन । 9 Sep 2020
By: Rajendra Salkar,16.45
कोपरगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचा आदेश लागु करण्यात आला असुन हा आदेश मोडणारा व तोंडाला मास्क न बांधणार्या शिंगणापूर येथील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरनं ६५९/२०२० भा द वि कलम १६०,१८८(२)२६९,२७७, सी आर पी सी १४४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन यासबंधीची फिर्याद पो.कॉ.८६४ अंबादास रामनाथ वाघ, (३२), नेम. कोपरगाव शहर पो.स्टे.यांनी दिली आहे.
नितीन अंकुश कुऱ्हे, अंकुश चंद्रभान कुऱ्हे, गोरख दिनकर कुऱ्हे, नानासाहेब गोरख संवत्सरकर, बापुसाहेब विठठल संवत्सरकर, विलास चंद्रभान संवत्सरकर, दत्तु गोरख संवत्सरकर, कैलास चंद्रभान संवत्सरकर सर्व रा. शिंगणापुर ता कोपरगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी (९ सप्टेंबर) रोजी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण तोंडाला मास्क न लावता पोलिसांसमोर आपापसात झुंज करताना शिंगणापुर रेल्वेगेटसमोर मिळून आले . त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.८५६ , ए. एम. दारकुंडे, करत आहे.





