पंचनाम्याची चालढकल पुरे ; तातडीने भरपाई दया-सौ स्नेहलता कोल्हे

पंचनाम्याची चालढकल पुरे ; तातडीने भरपाई दया-सौ स्नेहलता कोल्हे

वृत्तवेध ऑनलाईन।Sat12 Sep 2020
By : Rajendra Salkar, 16.30

कोपरगाव : अतिपावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे केवळ पंचनामे करून चालढकल करण्यापेक्षा झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजपा प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नहेलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, महसुलमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री , जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मतदार संघातील पोहेगाव, अंजनापुर, बहादरपुर, धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद, शहापुर, सोनेवाडी, चांदेकसारे, घारी आदी गावामध्ये दिनांक १० सप्टेंबर रोजी वादळी वा-याचा व मुसळधार पावसाचा तडाखा बसला, त्यामुळे या गावातील शेतातील उभी पिके उस, मका,कपाशी, कांदा रोपे, बाजरी, सोयाबीन, या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, पावसाच्या तडाख्यामुळे उभी असलेले पीके भुईसपाट झाली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले, विद्युत पोलच्या तारा तुटून मोठे नुकसान झाले. यापुर्वीही या भागावर नैसर्गिक आपत्ती येवून मोठया प्रमाणात नुकसान झाले होते, या संकटातून सावरत असतांनाच पुन्हा या भागातील शेतक-यांवर पुन्हा नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. यासाठी शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे.
सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शेतक-यावर मोठे आर्थीक संकट आले आहे, त्यामुळे उदरनिर्वाहाबरोबर अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहे, याही परिस्थितीत शेतीची मशागत करून पिके उभे करण्याची मोठी कसरत शेतक-यांनी करावी लागली, पिके शेतात उभी असल्याने थोडयाच दिवसात धान्याची रास घरात येणार असतांनाच वादळी वारा व अतिपावसामुळे शेतक-यांचे स्वप्नच उध्दवस्त झाले आहे. असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे .

Leave a Reply

You cannot copy content of this page