संजीवनीमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना संधी – BBA in Aviation Hospitality and Travel Tourism Management Degree Course

संजीवनीमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना संधी – BBA in Aviation Hospitality and Travel Tourism Management Degree Course

वृत्तवेध ऑनलाईन। Fir12Sep 2020
By : Rajendra Salkar, 16.30

कोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत मागील काही वर्षांपासून बीबीए इन इंटरनॅशनल बिझिनेस हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू असुन विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमास चांगली पसंती आहे. या अभ्यासक्रमाबरोबरच पालक व विध्यार्थ्यांच्या मागणीनुसार बीबीए इन एव्हिएशन हाॅस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल टुरिझम मॅनेजमेंट हा नवीन तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासुन करण्यात येणार असुन यासाठी किमान पात्रता इ. १२ वी असुन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती संस्थेने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की हा नवीन अभ्यासक्रम करणाऱ्या पदवीधरांना विमान सेवेत वेगवेगळ्याा पदांवर मोठी संधी आहे. त्याचप्रमाणे मुलींना हवाई सुंदरी होण्याची संधीही हा अभ्यासक्रम पुर्ण केल्यावर मिळणार आहे. तसेच कार्गो अँड ट्रान्सपोर्टेशन, कस्टमर सर्व्हिस , फेअर्स अँड टिकेटिंग, फ्लाईट अटेंडन्टस्, ट्रायव्हल डेस्क एक्झेक्युटिव्ह अशा सेवांमध्ये संधी मिळू शकते. श्री साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट, शिर्डी मुळे हा अभ्यासक्रम करणाऱ्यांना फायदा होणार आहे. विध्यार्थ्यांना नोकरी मिळवुन देण्यासाठी संस्थेमार्फत विशेष प्रयत्न केल्या जाणार आहेत.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांच्या समयसुचक व काळानुरूप कार्यपध्दतीमुळे संजीवनी अतंर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांनी देश पातळीवर नावलौकिक प्राप्त केला असुन ग्रामणि महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या मिळवुन देणारी संस्था म्हणुन संजीवनीचे नाव घेतल्या जाते. नवीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. हा अभ्यासक्रम पुर्ण केल्यावर हे विध्यार्थी एमबीए साठी पात्र असणार आहे. इ. १२ वी उत्तिर्ण विध्यार्थ्यानी नवीन अभ्यासक्रमाचा लाभ घेवुन नवीन क्षेत्रात करीअर करावे, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणतीही परीद्वाा नाही, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page