पाय घसरून गोदावरी नदीत पडलेल्या नगरपालिकेच्या सभा लिपिकाचा बुडून मृत्यू
वृत्तवेध ऑनलाईन।Mon14Sep20
By: Rajendra Salkar, 18.18
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेत सभा लिपिक दत्तात्रय किसनराव पंडोरे (५२), कोपरगाव यांचा पाय घसरून गोदावरी नदीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव येथे सोमवारी घडली. त्यांचा मृतदेह सडे शिवारातील खडकाळी गोदावरी नदी पात्रात सापडला आहे.
पंडोरे हे काही काळ वसुली विभागात काम करत होते. त्यानंतर काही महिन्यानंतर त्यांची सभा लिपिक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अर्धांगवायूचा सौम्य झटका आल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून ते रजेवर होते. दवाखान्यात उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. सोमवारी पहाटे फिरायला जातो. असे सांगून घरातून बाहेर पडले होते. पाय घसरून गोदावरी नदीचे पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला त्यांचे शव कोपरगाव ग्रामीण पोलिसांना सडे शिवारातील खडकाळी येथे गोदावरी नदी पात्रात मिळुन आले. याप्रकरणी मयताचा मुलगा सागर पंडोरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला खबर दिली सदर खबरी वरून कोपरगाव पोलीस स्टेशन कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
पंडोरे यांचा मृतदेह कोपरगाव ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ.६३९,आर. एम. म्हस्के करीत आहेत.
दरम्यान पंडोरे यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगरसेवक व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दुःख व्यक्त केले. यापूर्वी मार्केट विभागाचे सोपान शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर दत्तात्रय पांढरे यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केली यामुळे पालिका कर्मचा-यांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.