कोपरगाव कारागृहातील नऊ कैद्यांना कोरोनाची बाधा

कोपरगाव कारागृहातील नऊ कैद्यांना कोरोनाची बाधा

उपचारासाठी नगरला हलविणार

वृत्तवेध ऑनलाईन।Mon14Sep20
By: Rajendra Salkar, 18.30

कोपरगाव : तहसील कार्यालया लगत असलेल्या दुय्यम कारागृहात असलेल्या एकूण नऊ आरोपी कैद्यांना कोरोना ची बाधा झाल्याने कारागृह वर्तुळात तसेच पोलिसात खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी सध्या कोपरगावच्या दुय्यम कारागृहात एकूण साठ कैदी आहेत या सर्वांना बराक क्रमांक पाच मध्ये ठेवण्यात आले आहे.

काही दिवसापूर्वी श्रीरामपूर रस्ता लुटीतील चार कैद्यांना कोपरगाव येथे वर्ग करण्यात आले होते त्यां कैद्यांना ताप खोकला सर्दी अशी लक्षणे असल्याने त्यांच्यासह सर्व साठ कैद्यांची व महसूल प्रशासनाच्या आठ कर्मचाऱ्यांची तातडीने रॅपिड कोरोना टेस्ट करण्यात आली त्यात श्रीरामपूरचे वर्ग केलेले चार कैदी व व शहर पोलीस स्टेशन कोपरगाव यांनी मालेगाव येथून आणलेला एक कैदी असे पाच कैदी वगळता सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या चे प्रभारी तुरुंगाधिकारी यांनी सांगितले.

पॉझिटिव्ह आलेल्या पाच कैद्यांना स्वतंत्र बराकी ठेवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार केले जात आहे. दरम्यान कोपरगाव पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोनाही तपासणी करण्यात येणार आहे. बराकीत असलेल्या कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने तुरुंग प्रशासन व पोलिस वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आणखी चार कैद्यांची भर पडल्याने आता एकूण नऊ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने या सर्वांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात व कारागृहात अधिक उपचारासाठी हलवण्यात येणार आहे.

दरम्यान दुय्यम कारागृहास शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे , तहसीलदार योगेश चंद्रे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी संतोष विधाते शिर्डी लोणी राहाता कोपरगाव शहर व ग्रामीण च्या ५ पोलीस निरीक्षकांनी भेट दिली. गार्ड अंमलदार सुभाष आव्हाड, ए. एस. गुंजाळ, पी.सी. कुंडारे यांचीही कोरोना तपासणी करण्यात आली येथे असलेल्या ६० कायद्यापैकी १८ जणांना नाशिक येथील तुरुंगात हलवण्यात येणार आहे. तसा आदेश कारागृह उपमहानिरीक्षक औरंगाबाद यांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणाचा सर्व अहवाल कारागृह निरीक्षक पुणे, जिल्हाधिकारी नगर, कोपरगावचे न्यायाधीश व तहसीलदार आदींना पाठवण्यात आला आहे.

चौकट

कोपरगाव तालुक्यातील दुय्यम कारागृह नेहमीच चर्चेत असते येथे राहाता लोणी बाभळेश्वर शिर्डी व कोपरगाव तालुक्यातील कैदी आणून ठेवले जातात येथील चार बराकी ची संख्या केवळ वीस असताना ६० ते ८० कायद्या पर्यंत कैदी गुरा – ढोरा सारखे कोंबले जातात. याबाबत सातत्याने आवाज उठवूनही कारागृह प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे कोरोना लागण झाल्यामुळे आता बराकीची स्वच्छता पावडर फवारणी करून स्वच्छता ठेवली असल्याचे प्रभारी तुरुंगाधिकारी यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page