अशोक लकारे ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
कोपरगाव :
कोपरगाव शिवसेना माजी शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक अशोक लकारे यांची ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी बुधवारी(१जुलै) रोजी सकाळी ११ वाजता शिवालय येथे त्यांचा शाल श्रीफळ देऊन छोटेखानी सत्कार केला. व त्यांच्या पुढील समाज कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या,
यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग सदस्य दीपक साळुंके, माजी नगरसेवक बबलू वाणी, बापू पवार नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनोद राक्षे, सुभाष परदेशी उपस्थित होते.
बबलु वाणी यांनी प्रास्ताविक केले. विनोद राक्षे यांनी सूत्रसंचालन केले. बापु पवार यांनी आभार मानले.





