कोपरगाव नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांची कर सहायक पदी निवड.
कोपरगाव:
अत्यंत हालखीच्या परिस्थितीतुन भरातीय लष्करात दाखल होऊन 17 वर्ष सेवा करून निवृत्ती नंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सलग तीन वेळेस वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेत काम केलेले यात प्रामुख्याने मंत्रालयात लिपिक तद्नंतर सध्या कोपरगाव पालिकेत उपमुख्याधिकारी म्हणून कर्तव्य दक्ष म्हणून ओळख असलेले सुनील भाऊसाहेब गोर्डे यांची नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून कर सहायक पदी निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष योगेश बागुल व पालिकेतील सर्व नगरसेवक कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सुनील गोर्डे हे मूळचे राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे.अतिशय साधी राहानी व चांगला स्वभाव,कष्ट करण्याची जिद्द ,सर्व सामन्यासाठी इथून मागे केलेले काम हे गोर्डे यांच्या यशाचे कारण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सुनिल गोर्डे हे कोपरगाव येथेच झालेल्या आर्मी भरतीत मध्ये १५ जानेवारी २००१ रोजी भारतीय लष्करात दाखल झाले तर आर्मीतून ३१ जानेवारी २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले.आर्मी मध्ये सेवा करित असताना पुणे विद्यापीठातुन हिंदी विषयातुन बी. ए. पदवीधर २०१३ मध्ये मिळवली.सेवानिवृत्ती नंतर सतत १३ महिने प्रंचड अभ्यास करून कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, मंत्रालय लिपिक, कर सहायक अशा तीन पोस्ट काढल्या.
सध्या कोपरगाव नगरपरिषदेत उपमुख्याधिकारी म्हणून मागील दीड वर्षात विधानसभा निवडणुकीत तालुका आचारसंहिता कक्ष प्रमुख, २०१९ साली पुर परिस्थिती नियंत्रक अधिकारी तर स्वच्छ सर्वेक्षण अश्या वेगवेगळ्या कामातून आपल्या कामातुन छाप पाडली आहे.नुकत्याच कर सहायक पदासाठी झालेल्या परीक्षेत त्यांना घवघवीत यश मिळाले असून कर सहायक पदी सुनील गोर्डे यांची निवड झाली आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सुनील गोर्डे यांना कृष्णा गावडे कोल्हापूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
Post Views:
421