उदासीनतेमुळे सरकारात राहुनही मराठा समाजास न्याय देऊ शकत नाही   – स्नेहलता कोल्हे

उदासीनतेमुळे सरकारात राहुनही मराठा समाजास न्याय देऊ शकत नाही 

 – स्नेहलता कोल्हे

वृत्तवेध ऑनलाईन।Sat19Sep2020
By: Rajendra Salkar, 17.30

कोपरगाव : राज्याच्या राजकारणात  बहुसंख्य मराठा समाजाचे आमदार  मंत्रीपदेही भुषवित आहेत, परंतु  उदासिनतेमुळे ही नेते मंडळी मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करू शकत नाही अशी घणाघाती टीका  भाजपाच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता  कोल्हे यांनी केली असून या उदासीन सरकारला मराठा समाज कदापिही माफ करणार नाही, असेही त्या म्हणाल्या,

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या अनेक वर्षापासूनच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाली, मोर्चे निघाले, या प्रश्नांची तीव्रता लक्षात घेउन मागील सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेतला, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष लक्ष घालून मार्गी लावला. उच्च न्यायालयात टिकेल, यादृष्टीने प्रयत्न केले आणि उच्चन्यायालयात टिकवलेही, ही वस्तुस्थिती जनतेसमोर आहे. परंतु या सरकारच्या काळात राज्यकर्तेंनी हा विषयाकडे गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
फक्त आणि फक्त आघाडी सरकार हा प्रश्न व्यवस्थित हाताळू शकला नसल्यामुळे या परिणामाला मराठा समाजाला सामोरे जावे लागले आहे. या प्रश्नी  लक्ष घालून प्रामाणिकपणे प्रयत्न करणा-या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेवर मात्र काही संकुचित विचाराच्या महाराष्ट्रातील नेते म्हणून मिरवणा-या मंडळींनी फडणवीस ब्राम्हण म्हणून त्यांच्याविपयी वातावरण कलुशित करण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला आहे. जनतेचा कौल नसतांना सत्तेच्या खुर्चीसाठी जुगाड जमवून अपघाताने आलेले हे सरकार एकमेकांचे रूसवे फुगवे काढण्यात आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करून आर्थिक सोयीचे निर्णय घेण्यात मग्न आहे. पोलीस भरती करून मराठा समाजाच्या युवकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा आरोपही सौ कोल्हे यांनी केला आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page