आशा सेविकांचे कार्य कौतुकास्पद – स्नेहलता कोल्हे
The work of Asha Sevik is commendable
कोल्हेंची जन्मभूमी येसगाव, असली तरी कर्मभूमी शिंगणापूरच आहे
वृत्तवेध ऑनलाईन।Fri18Sep2020
By: Rajendra Salkar, 18.30
आदर्श प्रशासक पोलीस पाटील सौ. सविता आढाव यांचा गौरव
कोपरगाव : कोरोनात प्रत्येकजण घरात बसुन होता. मात्र या कठिण परिस्थितीत जीव धोक्यात घालून समाजातील शेवटच्या घटकाच्या आरोग्याची काळजी वाड्या-वस्त्यांवर जाऊन घेणाऱ्या आशा सेविकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार भाजपाच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शिंगणापूर हद्दीतील आशा सेविकांना सायकल वितरण प्रसंगी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी स्नेहलता कोल्हे यांनी सुचविलेल्या २५ लाखाच्या सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन केले.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात मतदार संघातील विकासकामे करतांना प्रत्येक गावांना न्याय देण्याचे काम केले, समाजपयोगी कामे प्रत्येक गावात करण्यास प्राधान्य दिले, त्यामुळे अनेक वास्तु उभ्या राहिल्या आहे. जन्मभूमी जरी येसगाव असली तरी माजी मंत्री शंकरराव कोल्हे , बिपीन आणि आम्ही नेहमीच कर्मभूमी असलेल्या शिंगणापूर गावाच्या विकासासाठी झुकते माप दिले आहे. या गावासाठी जे जे मागितले ते ते दिलेच आहे. हे सामाजिक सभागृह मोठे असुन एक भव्य अशी सुंदर वास्तु उभी राहणार असुन गावक-यांना आपल्या घरातील कार्यालाही याचा उपयोग होणार आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस या प्रकारे साजरा होतो ही खरोखर आनंदाची बाब आहे.
आशासेविका, आरोग्य सेविकां आणि आदर्श प्रशासक म्हणून गौरविण्यात आलेल्या पोलीस पाटील सौ. सविता प्रशांत आढाव यांचा यावेळी सौ. कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सौ सुनिता संवत्सरकर, सरपंच सुनिता संवत्सरकर, यादवराव संवत्सरकर, भाउलाल कु-हे, राजेंद्र लोणारी, अंकुश कु-हे, बाळासाहेब संवत्सरकर, शेखर कु-हे, डाॅ विजय काळे, प्रमोद संवत्सरकर, संजय तुळसकर, बाळासाहेब सोनपसारे याप्रसंगी उपस्थित होते. भिमा संवत्सरकर यांनी सुत्रसंचालन केले तर आभार कैलास संवत्सरकर यांनी केले.
चौकट- महाआघाडी सरकारकडुन दुर्लक्षीत राहिलेल्या आशा सेविकांना शिंगणापुर ग्रामपंचायतीने सन्मानित केले – सौ. स्नेहलता कोल्हे