डाऊच खुर्द परिसरात ढगफुटीसारखा पाऊस; क्षणार्धात उडाली दाणादाण!

डाऊच खुर्द परिसरात ढगफुटीसारखा पाऊस; क्षणार्धात उडाली दाणादाण!

वृत्तवेध ऑनलाईन,! Tue22Sep2020
By: Rajendra Salkar,20.20

कोपरगाव:  डाऊच खुर्द परिसरात  ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने एकच तारांबळ उडाली. विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट यासह पाऊसाने झोडपून काढत आहे.  अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.

मंगळवारी (22) रोजी दिवसभर उन्हाचा तडाका होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. चार नंतर अचानक जोरदार वाऱ्यासह तुफान पावसाला सुरुवात झाली. विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यासह पावसाने अक्षरशा झोडपून काढले. यामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले. वैभवनगर खडंकवसातील अनेक घरात पाणी घुसले. त्यामुळे मोठे नुकसान झाले.

    कोपरगाव तालुक्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपले डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी,चांदेकसारे परिसरात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले.शेतीतील सोयाबीन ऊस मका आदी पिके संपूर्ण पाण्याखाली  गेल्याने नुसकान झाले. डाऊच गावात जाणारा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना आपल्या घरी जाताच आले नाही. वैभव नगर ,खडकवसाहत परिसरातील घरे पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांची हाल झाली. याबाबत सरपंच संजय गुरसळ यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना कल्पना दिली. परिसरातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page